
३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट
अनेकजण फिट राहण्यासाठी व्यायाम करतात. किंबहुना रोज व्यायाम केल्याने त्यांना खूप फायदा होतो. आरोग्यसंपन्न, सुदृढ राहण्यासाठी व्यायाम (Exercise)करणे अत्यंत गरजेचे मानले जाते. पण काहींना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. इच्छा असूनही केवळ रोजच्या धावपळीमुळे (Lifestyle) अनेकांना व्यायाम करायला मिळत नाही. पण काही हरकत नाही. आता यावरही पर्याय मिळाला आहे. तुमच्याकडे डंबेल्स आहेत का! कारण एका अभ्यासात (Study) दिवसातून कमीत कमी तीन सेकंद वजन उचलल्याने तुमच्या स्नायूंची ताकद दीर्घकाळ वाढते, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील संशोधकांना जास्तीत जास्त प्रयत्न करून सिंगल बायसेप कर्ल केल्याने केवळ एका महिन्यात स्नायूंची ताकद 10 टक्के वाढू शकते, असे आढळून आले आहे. स्कॅन्डिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्समध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
हेही वाचा: व्यायामामुळे सुधारते लैंगिक आरोग्य, अभ्यासात स्पष्ट
असा केला अभ्यास
यासाठी एडिथ कोवान युनिव्हर्सिटी आणि निगाता युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अँड वेलफेअरच्या टीमने 39 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. त्यांनी चार आठवड्यांपर्यंत दिवसातून तीन सेकंद, आठवड्यातून पाच दिवस जास्तीत जास्त प्रयत्नात स्नायू (Muscle)आकुंचन केले. या विद्यार्थ्यांनी प्रयोगादरम्यान आयसोमेट्रिक, कॉन्सेंट्रिक किंवा विक्षिप्त बायसेप कर्ल अशा तीन प्रकारे केले. संशोधकांनी प्रत्येक व्यक्तीची वेटलिफ्टिंगपूर्वी आणि नंतर जास्तीत जास्त ऐच्छिक आकुंचन शक्ती तपासली, तसेच त्या चार आठवड्यांपर्यंत व्यायाम न केलेल्या 13 विद्यार्थ्यांच्या गटातील ताकद मोजली.
हेही वाचा: व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं? जाणून घ्या
आयसोमेट्रिक, कॉन्सेंट्रिकच्या तुलनेत दररोज फक्त बायसेप कर्ल केल्याने स्नायूंची ताकद सर्वाधिक वाढते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, व्यायाम न करणाऱ्या लोकांमध्ये कोणतेही फायदे दिसले नाहीत, असे अभ्यासातून दिसले. यासंदर्भातील अभ्यासाचे परिणआम ECU च्या स्कूल ऑफ मेडिकल अँड हेल्थ सायन्सेसचे प्रमुख संशोधक केन नोसाका यांनी मांडले असून त्यात तसेच चार आठवड्यात ६० सेकंद जरी व्यायामाची प्रेरणा-उत्तेजना (exercise stimulus ) असेल तरीही तुमच्या स्नायूंची ताकद वाढते, असे म्हटले आहे. बऱ्याच लोकांना व्यायामासाठी बराच वेळ काढावा लागतो, असे वाटते. पण चांगल्या प्रकारे व्यायाम केल्यास तो शरीरासाठी चांगला असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: रोज फक्त 10 मिनिटं जास्त चालल्यास वाढू शकते तुमचे आयुष्य

Lifting Weights Benefits
बायसेप कर्ल करण्याचे फायदे
संशोधकांना वजन उचलण्याच्या तीनही पद्धती व्यक्तीच्या स्नायूंची ताकद वाढविण्यास फायदेशीर आहे, असे आढळले. पण, विक्षिप्त पद्धतीने केलेले आकुंचन स्नायूंसाठी जास्त काम करते. अभ्यासानुसार, तीन-सेकंद बायसेप कर्ल करत असलेल्या लोकांनी महिन्याभराच्या एकूण ६० सेकंदांच्या व्यायामानंतर त्यांची एकूण स्नायूंची ताकद ११.५ टक्क्यांनी वाढवली.
हेही वाचा: घरी व्यायाम करण्यासाठी 'ही' उपकरणे महत्वाची
Web Title: Lifting Weights For Just 3 Seconds A Day Can Improve Muscle Strength Study Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..