Pav Bhaji Sandwich : ट्राय करा असं पावभाजी सँडविच, ज्याला बनवायला पावभाजी लागतच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pav Bhaji Sandwich

Pav Bhaji Sandwich : ट्राय करा असं पावभाजी सँडविच, ज्याला बनवायला पावभाजी लागतच नाही

Pav Bhaji Sandwich : सध्या सँडविच मध्ये अनेक प्रकार आलेले आहेत; अनेक नवीन नवीन लोकं यात नवीन एक्सपिरीमेन्ट ट्राय करता आहेत, असाच एक एक्सपिरीमेन्ट म्हणजे पावभाजी सँडविच, आणि गंमत म्हणजे हे सँडविच बनवतांना आपल्याला अजिबात पावभाजी लागणार नाहीये.अगदीच 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि चविलाही खूप जास्त टेस्टी; शिवाय तुम्ही कधीही ही रेसिपी बनवू शकतात, बघूयात याची रेसिपी!

हेही वाचा: Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

साहित्य:

2 उकडलेले चिरलेले बटाटे

2 टमाटे चिरलेले

2 चिरलेले कांदे

2 पाव/ ब्रेड

1 1/2 चमचा पाव भाजी मसाला

1/2 चमचा गरम मसाला

1 चमचा धणे जिरं पूड

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार बटर

1 1/2 चमचा लसणाची चटणी

कोथिंबीर

हेही वाचा: Gajar Halwa Recipe: असा बनवाल गाजरचा हलवा तर बोटं चाटत रहाल...

कृती:

1. सर्वात आधी सगळ्या भाज्यांचे गोल काप करून घ्या.

2. आता एका वाटीत पावभाजी मसाला, गरम मसाला, धणे जिरं पूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्या.

3. एका पॅनवरती बटर मेल्ट करायला ठेवा आणि त्यात हे मसाले टाकून द्या; त्यात लसणाची चटणी टाकून द्या.

4. आता त्यावर कोथिंबीर टाकून ब्रेड दोघी बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.

5. या ब्रेडवर चिरलेल्या भाज्या ठेवा आणि वरुण थोडं मीठ भुरभुरा.

6. पावभाजी सँडविच तयार आहे.