झटपट बनवा टेस्टी Mayonnaise Macaroni Salad, हॉटेल सारखी चव घरात

क्रिमी मेयोनीज मॅक्रोनी तुम्ही अगदी झटपट घरच्या घरी तयार करू शकता. शिवाय घरीच तयार करत असल्याने हॉटेलपेक्षा जास्त भाज्या Vegetables टाकून तुम्ही ही डिश अधिक हेल्दी बनवू शकता
मेयाॅनीज मॅक्रोनी सलाड
मेयाॅनीज मॅक्रोनी सलाडEsakal

लहान मुलं असो किंवा तरुण अनेकांना जंक फूड Junk Food खास करून पिझ्झा, पास्ता असे चिझी पदार्थ खाण्याची मोठी आवड असते. मग हॉटेलमध्ये जाऊन किंवा हॉटेलमधून Hotel असे पदार्थ घरी मागवले जातात. Recipe in Marathi Try This Mayonnaise Macaroni Salad

पण जर हे पदार्थ घरीच बनवता आले तर तेही अगदी हॉटेलसारख्या चवीचे?... आज आम्ही तुम्हाला अशीच एक सोपी आणि झटपट तयार होणारी क्रिमी मेयोनीज मॅक्रोनी पास्ताची रेसिपी Recipe सांगणार आहोत.

क्रिमी मेयोनीज मॅक्रोनी तुम्ही अगदी झटपट घरच्या घरी तयार करू शकता. शिवाय घरीच तयार करत असल्याने हॉटेलपेक्षा जास्त भाज्या Vegetables टाकून तुम्ही ही डिश अधिक हेल्दी बनवू शकता.

सलाडसाठी साहित्य- १०० ग्रॅम मॅक्रोनी, १ लाल सिमला मिरची, एक पिवळी सिमला मिरची, १ वाटी उकडलेले स्विट कॉर्न, १ काकडी, १ गाजर, १ कांदा, लेट्यूस

ड्रेसिंगसाठी लागणारं साहित्य- मेयोनीज पाव कप, क्रिम पाव कप, काळीमीरी पावडर पाव चमचा, चिली फ्लेक्स पाव चमचा, ऑरिगॅनो पाव चमचा, एक चमचा लिंबाचा रस, पाव चमचा लसूण पावडर. मीठ

हे देखिल वाचा-

मेयाॅनीज मॅक्रोनी सलाड
आता खाण्यासाठी नाही, तर केसांना वापरा मेयोनीज; जाणून घ्या फायदे

मेयोनीज मॅक्रोनी सलाडची कृती

सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा मीठ आणि एक चमचा तेल टाका.

पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मॅक्रोनी शिजण्यासाठी टाका.

मॅक्रोनी पूर्णपणे शिजल्यानंतर ती चालणीत काढून गरम पाणी काढून टाका. त्यानंतर वरून थोडं गार पाणी टाका आणि मॅक्रोनी गार होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता सर्व भाज्या मध्यम बारीक आकाराच्या तुकड्यांमध्ये कापून घ्या.

या भाज्या मॅक्रोनीसोबत एकत्र मिस्क करा.

ड्रेसिंग

मॅक्रोनी सलाडसाठीचं क्रिमी ड्रेसिंग तयार करण्यासाठी एका मोठ्या वाडग्यात मेयोनीज आणि क्रिम एकत्र करावं.

यात काळीमीरी पावडर, , चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, लिंबाचा रस आणि लसून पावडर तसचं चविनुसार मीठ मिसळून मिश्रण चांगलं एकजीव करा.

आता हे ड्रेसिंग भाज्या आणि मॅक्रोनीवर टाकून एकत्र करा.

या सलाडमध्ये तुम्ही हवं असल्यास काही ऑलिव्ह टाकू शकता.

अशा प्रकारे मेयोनीज मॅक्रोनी सलाड थंड सर्व्ह करण्यासाठी तयार होईल. हे सलाड अगदी लहानांपासून मोठ्यांना देखील नक्कीच पसंतीस पडेल. रात्री डिनरमध्ये किंवा दुपारच्या जेवणातही तुम्ही या सलाडचा आनंद घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com