Choose Good Vegetables : तुम्ही चांगली भाजी आणत नाही म्हणून बायको ओरडतेय, या टिप्स करतील मदत!

फळभाज्यांची ओळख कशी कराल
Choose Good Vegetables
Choose Good Vegetablesesakal

Choose Good Vegetables : बायकोने बाजारातून भाजी आणायला सांगितली की नवरोबा हमखास शिळ्या भाज्या नेतात. त्यांना भाजीतलं कळत नाही, असा काही विषय नसतो पण भाज्याच इतक्या खराब असतात की त्या घेताना फ्रेश असतात. पण, नंतर मात्र लगेचच त्या खराब होतात. त्यामुळे पतीदेवांनी आणलेल्या भाज्या खराब होतात.

भाजी कशी खरेदी करायची हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. नाहीतर आजकाल अनेक भेसळयुक्त रसायनांनी तयार केलेल्या भाज्या बाजारात मिळतात.फ्रेश आणि ताज्या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. पण बाजारात फ्रेश भाजी कशी निवडायची. ज्यातून खरंच पोषक तत्व मिळतील अशा भाज्या कशा ओळखायच्या याच्या काही टिप्स आज पाहुयात.

Choose Good Vegetables
Vegetable Rates Hike : आठवडे बाजारालाही उन्हाचा तडाखा! पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांच्या दरांत वाढ

भाज्या का खाव्यात

पालेभाजी हा एक असा अन्नघटक आहे. की तो आजच्या बहुसंख्य तरुण-तरुणींना आहारात आवडत नाही.पण लक्षात घ्या की आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन्स, टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा आपल्या भोजनाच्या ताटातला एक कोपरा पालेभाजीला द्या आणि फरक पहा.

पालेभाज्यांमध्ये तुम्हाला दिवसभर टवटवीत ठेवण्याची, तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्याची ताकद आहे. पालक, माठ, मेथी या भाज्या तुमच्या शरीराला असलेली प्रोटीनची कमी भरून काढतात. फळ आणि पालेभाज्यांमध्ये असलेले कॅल्शियम तुम्हाला हेल्दी ठेवते.

Choose Good Vegetables
Most Expensive Vegetable : जगातील सर्वात महाग भाजी माहितेय? किंमत ऐकून थक्क व्हाल! अनेक रोगांवर आहे फायदेशीर

पालेभाज्या कशा निवडाव्यात?

पालक  - पालकाची पाने नेहमी खूप कोवळी, पातळ नसावीत किंवा खूप मोठी नसावी. पालकाचा देठ व पाने यांची उंची खूप नसावी. बुट्टा पालक खाण्यासाठी नेहमी चांगला असतो, ही आजीची शिकवण. पालकाच्या देठांचा रंग किंचित गुलाबीसर हवा, तर तो गावठी पालक समजावा.

मेथी - लाल कोराची मेथी खाण्यासाठी उत्तम समजली जाते. लाल कोर ्म्हणजे मेथीच्या पानांभोवती लालसर रंगाची किनार असते. या मेथीची पाने गोलाकार असतात. लांबट पानांची, फुलोरा असलेली मेथी कधी घेऊ नये.

शेपू - पालकाप्रमाणेच शेपूही उंचीने बुट्टा असलेला घ्यावा.

कोथिंबीर - जांभळसर व मऊ देठांची कोथिंबीर घ्यावी. मोठ्या, गोलाकार पानांची कोथिंबीर हायब्रीड असते, या पानांना चव व वास नसतो. ती घेऊ नये.

Choose Good Vegetables
Vegetables Rate : पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले

फळभाज्यांची ओळख कशी कराल

भेंडी - तुम्हाला फक्त भिंडी खरेदी करताना लगेच टॉप तोडायचा आहे. दाब न देता ती पटकन तुटली तर ती ताजी आणि खरी भिंडी आहे. त्यावर ती वाकली तर ती शिळी भेंडी असते.

फ्लॉवर -  बाजारात  पांढऱ्या शुभ्र रंगाचे, मोठ-मोठ्या आकाराचे फ्लॉवरचे कंद मिळतात परंतु, हे कंद आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. हायब्रीड पद्धतीने ते पिकविलेले असतात. त्याऐवजी पिवळसर दिसणारे, छोट्या, मध्यम आकाराचे फ्लॉवरचे कंद घ्यावे. या कंदाचे तुरेही मोकळे दिसतात.

वांगी - वांगी नेहमी हिरवट-पांढऱ्या रंगाची, मध्यम आकाराची घ्यावी. गावठी वाणाची ती असतात. शिजतातही पटकन व त्याची चवही छान असते. जांभळी वांगी सहसा घेऊ नयेत, कारण ती बेचव, कडवट लागतात.शिजल्यावर ती काळीही दिसतात.

कारली - काळपट हिरव्या रंगाची, अगदी लहान आकाराची कारली कधी घेऊ नये. छान पोपटी रंगाची, मध्यम आकाराची कारली घ्यावी. या कारल्याची चव खूप छान लागते.

गवार - गावठी व चोपडी गवार असे दोन प्रकारात बाजारात मिळतात. पैकी चोपडी गवार शेंग पोपटी व मोठी असते. तर गावठी गवार शेंग लहान आकाराची असते. ती शिजतेही लवकर व चवीला चांगली लागते.

Choose Good Vegetables
Vegetable Rates Hike : आठवडे बाजारालाही उन्हाचा तडाखा! पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांच्या दरांत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com