esakal | एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही, 'असा' तयार करा टेस्टी अन् मस्त मालपुआ
sakal

बोलून बातमी शोधा

recipe of malpua nagpur news

उत्तर भारतातील इतर राज्यामध्ये देखील आवडीने खाल्ला जातो. तर पाहुयात मालपुआ कसा बनवायचा?

एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही, 'असा' तयार करा टेस्टी अन् मस्त मालपुआ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : उत्तर भारतीयांचा आवडता पदार्थ म्हणजे मालपुआ. विशेष म्हणजे ही हा पदार्थ राजस्थानचा खाद्य संस्कृतीमधील पारंपरीक पदार्थ आहे. मात्र, उत्तर भारतातील इतर राज्यामध्ये देखील आवडीने खाल्ला जातो. तर पाहुयात मालपुआ कसा बनवायचा?

साहित्य -
1/4 कप खवा
१ कप दूध
१ कप गव्हाचं पीठ
३ मोठे चमचे बडीशेप
२ कप साखर
१ कप पाणी
२०० ग्राम तूप
पदार्थ सजविण्यासाठी
३ कापलेले बदाम
चिमूटभर विलायची

हेही वाचा - गर्दी करणे, मास्क न लावणे भोवले; १६ व्यापाऱ्यांना प्रशासनाचा दणका

कृती -
एका भांड्यात १/४ कप खवा घ्या. त्यामध्ये १ मोठा कप दूध घाला. दोन्ही पदार्थ चांगल्याने मिसळून घ्या. त्यानंतर खव्यामध्ये दूध चांगल्यारितीने मिक्स झाल्यानंतर १ कप मैदा घाला. त्यानंतर याला व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर यामध्ये ३ मोठे चमचे बडीशेप घाला. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. या मिश्रणामध्ये एकही गुठळी तयार होऊ नये याची काळजी घ्या. त्यानंतर याला काही वेळासाठी झाकून ठेवा. 

पाक बनविण्याची कृती -
पाक बनविण्यासाठी एका नॉनस्टीक पॅनमध्ये पाणी घेऊन उकळू द्या. त्यामध्ये दोन कप साखर घाला. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर विलायची टाका. त्यानंतर ६ ते ८ मिनिटापर्यंत उकळू द्या.  

हेही वाचा - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

मालपुआ डीप फ्राय करा -
एका खोलगड भांड्यात तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्या. त्यानंतर यामध्ये आधीच तयार केलेल मिश्रण गोलाकार करून थोडे थोडे टाका. मंद आचेवर त्याला तळून घ्या. तसेच त्याचा सोनेरी रंग आल्यानंतर त्याला बाहेर काढून थंड करा.

सर्व मालपुआ तयार झाल्यानंतर पाकामध्ये टाका. काही वेळ हे मिश्रण तसेच झाकून ठेवा. त्यानंतर तुमचा टेस्टी मालपुआ खाण्यासाठी तयार असेल. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ३० मिनिटापर्यंत मालपुआ पाकामध्ये ठेवू शकता.

प्लेट सजवा -
प्लेटमध्ये सर्व्ह केल्यानंतर वरून थोडे तूप घाला. त्यानंतर चिमूटभर विलायची आणि कापलेले बदाम टाका. गार्निशिंग झाल्यानंतर हा पदार्थ खाण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. मग वाट कसली बघताय. आजच ट्राय करा ही स्वस्त अन् मस्त रेसिपी.