esakal | Recipe - मऊ, गोडसर रताळाच्या 'घाऱ्या' कशा बनवाव्यात? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

मऊ, गोडसर रताळाच्या 'घाऱ्या' कशा बनवाव्यात? जाणून घ्या

मऊ, गोडसर रताळाच्या 'घाऱ्या' कशा बनवाव्यात? जाणून घ्या

sakal_logo
By
स्नेहल कदम

'घारी' म्हटलं की आपल्याला आठवतो तो भोपळा. कदाचित 'घारी' हा शब्हही अनेकांनी आज पहिल्यांदा ऐकला असेल. काही ठिकाणी या पदार्थाला वेगळ्या नावानेही ओळखले जात असावे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सर्रास हा पदार्थ बनवला आणि तितक्याच चवीने खाल्ला जातो. 'घारी'च नाव जरी घेतलं तरी तिचा गोडवा जिभेवर रेंगाळत राहतो. महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणाऱ्या संक्रातीच्या सणाला हा पदार्थ बनवला जातो. ग्रामीण भागासह शहरांतही या भोपळ्याच्या घाऱ्या अनेकजण चवीन खातात. मात्र वर्षभरात फक्त या सणासाठी खास बनवल्या जातात. मात्र यासारख्याच रताळाच्याही 'घारी' तुम्ही त्या हंगामात बनवू शकता. अतिशय सोपी आणि अगदी मोजक्याच साहित्यात ही रेसिपी बनवली जाते. मऊ, गोड घारी कशी बनवावी याची रेसिपी आपण आता पाहणार आहोत.

हेही वाचा: दहा इडल्यांची ‘आंबलेली’ कथा

साहित्य -

  • रताळी - अर्धा किलो

  • गूळ - ४ कप छोटे

  • गहू पीठ - अर्धा किलो

  • वेलची - आवश्यकतेनुसार

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • खसखस - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: डोसे, भेळ सगळं आवडीचे : वरुण धवन

कृती -

सुरुवातीला रताळी स्वच्छ धुऊन घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात रताळी शिजत टाका. शिजल्यानंतर रताळे एका भांड्यामध्ये घेऊन स्मॅश करून बाजूला ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात आवश्यक तेवढे गव्हाचे पीठ घ्या यात किसलेला गुळ टाका. याशिवाय वेलचीची पावडर टाका. शक्यतो हे पीठ ओलसर (थोडे पातळ) ठेवावे. पुरीच्या आकाराप्रमाणे या तयार मिश्रणाच्या छोट्या छोट्या घाऱ्या बनवाव्या. यासाठी तु्म्ही पोळपाटाचा वापर करु शकता. पोळपाटावर ओले कापड टाकून त्यावर तयार पीठाला पुरीप्रमाणे आकार द्या. (या पीठाचा गोळा घेऊन तो हाताने अलगत भाकरीप्रमाणे थापटून घ्यावा.) त्याला वरच्या बाजूला दोन खसखसची बोटे लावावीत. कढईमध्ये तेल टाकावे आणि गरम तेलात लालसर घाऱ्या तळून घ्याव्यात. गोड, मऊमऊ रताळाची घारी तयार आहे. तुम्ही चहासोबत सर्व्ह करु शकता.

loading image
go to top