Honey Chicken Wings; लॉकडाऊनमध्ये घरीच ट्राय करा रेस्टोरंट पद्धतीची रेसिपी

आज ही खास रेसिपी आपण पाहणार आहोत
Honey Chicken Wings; लॉकडाऊनमध्ये घरीच ट्राय करा रेस्टोरंट पद्धतीची रेसिपी

कोल्हापूर : भारतात सध्या covid-19 चे पेशंट वाढत असल्याने अनेक राज्याने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरू आहे. यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्याने फक्त होम डिलिव्हरीसाठी परमिशन दिली आहे. परिणामी संरक्षणासाठी अनेक लोकांनी फुड ऑर्डर करणेही टाळले किंवा कमी केले आहे. यामध्ये तुम्ही किचनमध्येच अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान किचनमध्ये अनेकजण शेफ झाले होते. अनेकांचे विविध पदार्थ बनवताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामधून अनेक पदार्थ पुढे आले. बरेचजणांनी पाणीपुरीपासून, पिझ्झा असे अनेक पदार्थ घरीच बनवले होते. यादरम्यान अनेक रेसिपीज पुढे आल्या. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे चिकन विंग्स ही आहे. शहरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये ही रेसिपी पाहायला मिळते. आज ही खास रेसिपी आपण पाहणार आहोत.

रेसिपी कशी बनवावी

एका बाऊलमध्ये चिकन विंग्स घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, लिंबूचा रस आणि आलं लसुनची पेस्ट घाला. हे सर्व एकत्र केल्यानंतर दोन तासासाठी याला एकत्र मुरु द्या. यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून त्यात चिकन विंग्स टाका. यामध्ये लिंबूचा रस आणि मध घाला. आणि मिश्रण एकत्र करा. दहा मिनिटांसाठी हे मिश्रण शिजू द्या. स्वादिष्ट चिकन विंग्स शिजवून घ्या. तयार रेसिपी तुम्ही सर्व्ह करू शकता.

Honey Chicken Wings; लॉकडाऊनमध्ये घरीच ट्राय करा रेस्टोरंट पद्धतीची रेसिपी
Corona vaccination: दापोली पॅटर्न यशस्वी! दोन दिवसांत 500 जणांचं लसीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com