Corona vaccination: दापोली पॅटर्न यशस्वी! दोन दिवसांत 500 जणांचं लसीकरण

लससाठी होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी पाहता, दापोलीचा पॅटर्न साऱ्यांसाठी ठरतोय वस्तुपाठ
Corona vaccination: दापोली पॅटर्न यशस्वी! दोन दिवसांत 500 जणांचं लसीकरण

दाभोळ : लसीकरणासाठी होणारी गर्दी आणि अपेक्षित गोंधळ टाळण्यासाठी बनवलेला दापोली पॅटर्न (covid vaccination dapoli pattern) अतिशय यशस्वी ठरला आहे. दोन दिवसांत पाचशे नागरिकांचे लसीकरण करताना कोणतीही गडबड, गोंधळ नाही, नागरिकांची ससेहोलपट नाही, त्यांचे तिष्ठणे नाही, असा अत्यंत सुखद अनुभव होता. रत्नागिरी आणि चिपळूणसारख्या (ratnagiri and chiplun) सुशिक्षित म्हणवणाऱ्या शहरांमध्ये लससाठी होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी पाहता, दापोलीचा पॅटर्न हा साऱ्यांना वस्तुपाठ ठरावा.

दापोली शिक्षण संस्थेच्या सोहनी विद्यामंदिर येथे आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात १० मे रोजी एकाच दिवशी ४४ वर्षावरील ४०० नागरिकांसाठी कोव्हीशिल्डचा (covishield) दुसरा डोस देण्यात आला. दापोली उपजिल्हा रुग्णालय व हेल्प ग्रुप यांचे वतीने लसीकरण केंद्राचे व्यवस्थापन अतिशय उत्तम तऱ्हेने करण्यात आले. दापोली पॅटर्ननुसार हेल्प ग्रुपकडे नोंदणी केलेल्या सर्वांना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी स्वयंसेवकांकडून दूरध्वनी करुन केंद्रावर बोलावण्यात आले.

Corona vaccination: दापोली पॅटर्न यशस्वी! दोन दिवसांत 500 जणांचं लसीकरण
'साहेब, 20 वर्षे काम करतेय; आता तरी पगार सुरु करा'; शिक्षिकेची विनवणी

केंद्रावर नागरिकांना टोकन देऊन एका सभागृहात बसविण्यात येत होते. सभागृहात आसन व्यवस्था होती. दहा-दहाच्या गटाने नागरिकांना लसीकरण केंद्रात नेले जात होते. तेथे दोन नर्स लसीकरण करत होत्या. यामुळे दुपारी जेवणाच्या सुटीपर्यंत सुमारे २२५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. दुपारनंतर उर्वरित नागरिकांना केंद्रावर बोलाविण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. बनसोडेंसह हेल्प ग्रुपचे समीर गांधी, बाळू भळगट, डॉ. दीपक हर्डीकर, ॲड. विजयसिंह पवार, धनंजय गोरे, सुरेश केळकर, सुमेध करमरकर, ह्रषीकेश ओक, महेश पटोलीया, संदीप बागाईतकर, प्रसाद फाटक यांनी उत्तम व्यवस्थापन केले.

या आधी काय होत होते...

  • विनाकारण सकाळी सहा वाजल्यापासून रांग

  • लस मिळेपर्यंत ससेहोलपट होत होती

  • सोशल डिस्टंसिंग नसल्याने होता धोका

  • गर्दीचे नियंत्रण करणे प्रशासनाला अशक्‍य

पॅटर्नमुळे नेमके झाले काय...

  • ज्यांना लस द्यायची, तेवढेच लोक आले

  • नेमकी वेळ कळल्याने विलंब टळला

  • लसीकरणात सुसूत्रता आली

  • वादविवाद, पोलिसांची गरज नाही

Corona vaccination: दापोली पॅटर्न यशस्वी! दोन दिवसांत 500 जणांचं लसीकरण
'तेरा मुझसे हैं...' गाणं म्हणत पूर्ण केली आईची अखेरची इच्छा

दुसऱ्या दिवशीही...

नागरिकांना ५० च्या ग्रुपने फोन करुन लसीकरण केंद्रावर बोलाविले जाते. केंद्रावर गर्दी, गोंधळ होत नाही. पहिल्या दिवशी आम्ही ४०० नागरिकांना कोव्हीशिल्ड लस घेण्यासाठी मदत केली. कोणा ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा मिळत नसेल किंवा वाहन उपलब्ध होत नसेल तर आमचे स्वयंसेवक या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरातून लसीकरण केंद्रावर घेऊन येतात व त्यांना घरी सोडतात, असे दीपक हर्डीकर यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात १८ ते ४४ या वयोगटातील १००नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यांचे लसीकरण झाले, तर दुसऱ्या सत्रात ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com