Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना येईल राग; रुह अफजा टाकून बनवला गुलाबी चहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rooh afza tea viral video
Viral Video : 'हा' व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना येईल राग; रुह अफजा टाकून बनवला गुलाबी चहा

'हा' व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना येईल राग; रुह अफजा टाकून बनवला गुलाबी चहा

चहा (Tea) लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. वेळेला चहा लागतोच. पण तो चहा ताजा, आलं, पाती चहा टाकून केलेला असला की तो पिण्याची मजा येते. मात्र लोकं आता चहावरही वाट्टेल ते प्रयोग करायला लागले आहेत. तंदुरी चहा असाच लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक चहा सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे.

सध्या सोशल मीडियावर रूह अफजा घालून केलेल्या चहाचा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. चहाची अशी वाट लावल्याने लोकांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकूणच या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (Rooh Afza Tea Viral Video)

हेही वाचा: चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या..

chatore_brothers नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुधात रुह अफजा मिसळत असल्याचे दिसून येते. चहा पूर्णपणे लाल होत आहे. त्यानंतर एक व्यक्ती चहाचा घोट घेतो आणि तो फेकून देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीला चहा अजिबात आवडलेला दिसत नाहीये. (Rooh Afza Tea Viral Video)

हेही वाचा: कोंड्याचा मांडा खाल्लात का? जाणून घ्या रेसिपी

३ लाखांच्या आसपास लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर २५ लाख लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - खरच बकवास चहा, दुसर्‍या यूजरने लिहिले आहे - हा गुलाबी चहा आहे, तो प्याल्यानंतर मानवी मेंदू काम करणे बंद करतो. अशा अनेक कमेट्स लोकांनी केल्या आहेत. (Rooh Afza Tea Viral Video)

हेही वाचा: मटण आवडतं! मग, हा प्रकार खाण्याआधी फायदे-तोटे जाणून घ्या

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top