शिजवलेलं अन्न अनेक दिवस साठवायचंय? मग वापरा Blast Chiller

ब्लास्ट चिलिंग हे कमी कालावधीसाठी अन्न थंड ठेवण्यासीठ वापरलं जाणारं तंत्रज्ञान आहे. जे अन्न किंवा इतर पदार्थ तुम्हाला २४ तासांमध्ये वापरायचे आहेत किंवा त्यांची विक्री करायचीय त्यासाठी ब्लास्ट चिलरचा वापर होवू शकतो
ब्लास्ट चिलरमध्ये अन्न साठवण
ब्लास्ट चिलरमध्ये अन्न साठवणEsakal

अन्न वाया गेलेलं सहजा कुणालाही आवडत नाही. एखाद्या मोठ्या समारंभात, पार्टीमध्ये बऱ्याचदा जेवण शिल्लक राहत. तसचं हॉटेल्स, कॅफे, कॅटरिंग अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ बनवले जातात. अशा वेळी हे पदार्थ कसे स्टोअर Food Storage करावे ते खराब तर होणार नाहीत ना, अशी चिंता असते. शिल्लक राहिलेलं जेवण Food किंवा अतिरिक्त जेवण स्टोअर करण्यासाठीच ब्लास्ट चिलर हा आता एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. Use Blast Chiller to Store cooked food for many Days  

ब्लाट चिलर आणि आपल्या घरातील रेफ्रिजिरेटर Refrigerator किंवा आयस्क्रिम फ्रिज यात मोठा फरक आहे. ब्लास्ट चिलरसोबतच ब्लास्ट फिजर हा देखील एक पर्याय आहे. ब्लास्ट चिलर आणि ब्लास्ट फ्रिजरमध्ये थोडाफार फरक आहे.

काय आहे ब्लास्ट चिलर?

ब्लास्ट चिलिंग हे कमी कालावधीसाठी अन्न थंड ठेवण्यासीठ वापरलं जाणारं तंत्रज्ञान आहे. जे अन्न किंवा इतर पदार्थ तुम्हाला २४ तासांमध्ये वापरायचे आहेत किंवा त्यांची विक्री करायचीय त्यासाठी ब्लास्ट चिलरचा वापर होवू शकतो. जे पदार्थ तुम्हाला फ्रिजरमध्ये ठेवायचे नाहित जे तुम्हाला काही तासांमध्ये विकायचे आहेत त्यासाठी याचा वापर होतो.

हे चिलर्स अन्न जलद गतीने थंड करतात शिवाय ते बाहेर काढण्यासाठी डीफ्रॉस्ट किंवा वितळवण्याची गरज भासत नाही. ब्लास्ट चिलरमध्ये एखाद्या कपाटाप्रमाणेच अनेक वेगवेगळे कप्पे असतात. या चिलर्समध्ये अन्न पदार्थांवर थंड हवा फेकली जाते आणि ते थंड ठेवले जातात. ब्लास्ट चिलरमुळे खाद्य पदार्थ न गोठता त्यातील मुळ ओलावा आणि चव टिकवून ठेवण्यास मदत करतं. 

तर ब्लास्ट फ्रिजर हे वर्षभर किंवा त्याहून जास्त काळ अन्न पदार्थ टिकवण्यासाठी उपयोगात येतात. ब्लास्ट फ्रिजरच्या तुलनेत चिलरची तापमान क्षमताही कमी असते. ब्लास्ट चिलर हे उत्पादनांचं किंवा अन्न पदार्थांचं तापमान सरासरी _10 C पर्यंतकमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात. 

हे देखिल वाचा-

ब्लास्ट चिलरमध्ये अन्न साठवण
Fridge Caring Tips : फ्रिज अन् भिंतीमध्ये किती अंतर असावं? तुमच्या एका चुकीमुळे येतं भरमसाठ वीज बिल

ब्लास्ट चिलरमुळे हॉटेलमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं तसचं खाद्य पदार्थांना स्टोअर करणं शक्य आहे.  यामुळे  जेवणाची शेल्फ लाईफ वाढते म्हणजेच ते जास्त काळ टिकून राहतं. यात जेवण सहजरित्या अगदी ताज्या जेवणाप्रमाणे तयार होण्यास मदत होते.

या चिलरमध्ये वेगवेगळे कप्पे असतात. तसचं वेगवेगळ्या पदार्थांनुसार तापमान नियंत्रित करण्यासाठी खास सेटिंगही असते. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे चिलर्स घेण्याची आवश्यकता नाही. 

जेवण खराब होण्याची चिंता नाही

४० ते १४० डिग्री फॅरनहाइट या तापमानात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात तयार होण्याची शक्यता असते. तापमानाच्या या डेंजर झोनमध्ये अन्न जास्त काळ राहिल्यास अन्नजन्य आजार होण्याची म्हणजेच हे अन्न खाल्याने आजार पसरण्याची शक्यता वाढते. ब्लास्ट चिलर हे तापमान जलद गतीने कमी करून त्याला सेफ झोनमध्ये आणण्यास मदत करतं.

ब्लास्ट फ्रिजरच्या मदतीने वर्षभर अन्न ठेवा साचवून Blast freezer Use

ज्यांना दीर्घ काळासाठी अन्न पदार्थ साचवून ठेवण्याची आवश्यकता भासते त्यांच्यासाठी ब्लास्ट फ्रिजर हा योग्य पर्याय आहे. ब्लास्ट फ्रिजरच्या मदतीने पदार्थ जवळपास वर्षभराच्या काळासाठी टिकवून ठेवले जाऊ शकतात. ब्लास्ट फ्रिजर हा काहिसा ब्लास्ट चिलरप्रमाणेच आहे. मात्र यातील मुख्य फरक हा ऑपरेशनल आकार आणि तापमान ग्रेडियंटमध्ये आहे. ब्लास्ट फ्रिजर हे चिलहून अधिक कमी तापमान क्षमतेचं असतं. ब्लास्ट फ्रिजरही पदार्थांची गुणवत्ता आणि चव टिकवून ठेवण्यास मदत करतं.त्या व्सवसायात वर्षभरासाठीचं उत्पादन घेतलं जातं. त्या अशा प्रकारच्या फ्रिजरचा वापर करतात.

ब्लास्ट चिलर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी पडताळा 

ब्लास्ट चिलरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जसं की सर्व प्रथम तुमच्या उत्पादनाचा प्रकार आणि तो किती दिवस तुम्हाला स्टोअर करायचा आहे. म्हणजेच स्टोअरेज वेळ. तुमच्या उत्पादनाचा म्हणजेच प्रोडक्टचा आकार, त्यासाठी तुम्हाला किती तापमान ठेवण्याची गरज आहे. उत्पादनातील फॅटस् आणि पाण्याचं प्रमाण तसंच उत्पाजन आणि गुणवत्ता या गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूक करा. Check this Before buying Blast chiller   

जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर गुंतवणूक करताना तुम्ही ब्लास्ट फ्रिजरमध्ये गुंतवणूक करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com