esakal | हेल्दी फूड : वजन घटवायचंय... हे टाळाच
sakal

बोलून बातमी शोधा

Weight

हेल्दी फूड : वजन घटवायचंय... हे टाळाच

sakal_logo
By
शौमा मेनन

कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत आणि त्याचा मोठा फटका नियमित व्यायाम करणाऱ्यांना बसतो आहे. जिम बंद आहेत व मॉर्निंग वॉकवरही मर्यादा आल्या आहेत. या परिस्थितीत वजन वाढण्याची समस्या पुन्हा डोके वर वाढत आहे. या परिस्थितीत काही चुकीचे उपाय करून वजन कमी करण्याचे पर्याय निवडले जात आहेत. या परिस्थितीत काय टाळावे, हे पाहूयात.

मी दिवसातून एकदाच गोड खातो, मी चहात साखरेऐवजी गुळाचा वापर करतो, मी अल्कोहोल रोज न घेता दिवसाआड घेतो, मला साखर सोडायची आहे, पण शक्य होत नाही, मला तळलेले पदार्थ आवडतात, मात्र मी ते कधीतरीच खातो... या आणि अशा अनेक सबबी लोक सांगत असतात. मात्र, तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास किंवा तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची असल्यास असा कोणताही मध्यममार्ग उपलब्ध नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील काही पदार्थांपासून कायमच दूर राहणे गरजेचे आहे. ही यादी कितीही मोठी होऊ शकते, मात्र किमान या गोष्टींना तरी तुम्ही नाहीच म्हटले पाहिजे....

साखर - साखरेपासून कायम दूरच राहा. साखरेमुळे तुमच्या तब्येतीसाठी काहीही चांगले घडत नाही. तुम्ही कधी ‘साखरेपासून होणारे फायदे’ असे शीर्षक वाचले आहे का....

रिफाइंड तेले - अतिप्रक्रिया केलेल्या या तेलांपासून कायमच दूर राहा. त्यामुळे तुमच्या हृदयातून वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.

रिफाइंड पीठे - मैदा तुमच्या शरीरासाठी अत्यंत अनावश्यक गोष्ट आहे. ते तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठीही चांगले नाही.

कार्बोनेटेड पेये - कार्बन डायऑक्साईडचा समावेश असलेली बाजारात मिळणारी पेये शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. त्यातील साखरही घातक ठरते. या पेयांमुळे तुमची तहान अजिबात भागत नाही, उलट ती वाढतेच.

पॅकबंद तृणधान्ये आणि प्रक्रिया केलेले मांस - हे पदार्थ शरीरासाठी घातक ठरतात. या प्रक्रिया केलेल्या अन्नावर तुमच्या शरीरामध्ये आणखी प्रक्रिया करू नका, त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.