Spicy Receipe - गावरान ठसका! हिरव्या मिरचीचा झणझणीत खर्डा; एकदा ट्राय कराच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावरान ठसका! हिरव्या मिरचीचा झणझणीत खर्डा; एकदा ट्राय कराच

अनेक ठिकाणी याला 'खर्डा' असंही म्हंटलं जातं.

गावरान ठसका! हिरव्या मिरचीचा झणझणीत खर्डा; एकदा ट्राय कराच

खाद्यसंस्कृती म्हटंल की, राज्यासह देशातील अनेक ठिकाणं आपल्याला आठवतात. चटपटीत, झणझणीत खाणं प्रत्येकाला आवडतंच. देशाच्या अनेक भागात राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट आणि परंपरेनुसार बरेच खाद्यपदार्थ बनवले जातात. खवय्ये अशा अनेक ठिकाणांना भेटी देऊन खास वेगवेगळ्या चवीच्या डिशेसची चव चाखतात. दरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीने खाल्ला जातो. भाजी बनवण्यासाठी घरी काही फळभाजी शिल्लक नसेल किंवा तोंडाची चव गेलीये असं वाटत असेल अशावेळी 'हिरव्या मिरचीचा ठेचा'ला पर्याय म्हणून पाहू शकतो. अनेक ठिकाणी याला 'खर्डा' असंही म्हंटलं जातं. हा झणझणीत गावरान 'खर्डा' कसा बनवावा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा: अभिनेत्री शर्वरी जमेनीसची पाककला

साहित्य -

  • हिरव्या मिरच्या - २०० ग्रॅम

  • शेंगदाण्याचा कूट - ४ चमचे

  • बारीक चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • मीठ - आवश्यकतेनुसार

हेही वाचा: Benefits Of Fish: हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी खात राहा फिश

कृती -

सुरूवातीला हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. त्यानंतर या मिरच्यांचे दोन दोन तुकड्यात चिरुन घ्याव्या. यानंतर त्या तेलात भाजून घ्याव्या. भाजलेल्या मिरच्या थंड होऊ द्या. यानंतर घरी असेल तर खलबत्त्याच्या सहाय्याने या बारीक करुन घ्या. खलबत्ता नसल्यास तुम्ही मिक्‍सरचाही वापर करु शकता. दुसऱ्या बाजूला तेल गरम करून त्यात शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक केलेले मिरचीचे वाटण घाला. यात थोडे मीठ टाका. थोड्या काळासाठी हे मिश्रण परतवून घ्या. झणझणीत गावरान 'खर्डा' तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत हा गावरान 'ठेचा' किंवा 'खर्डा' सर्व्ह करू शकता.

loading image
go to top