Tomato Soup- टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप Recipe, तुमच्या मुलांना नक्की आवडेल | how to make tomato soup at home | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tomato soup recipe

Tomato Soup Recipe: टेस्टी आणि हेल्दी टोमॅटो सूप, तुमच्या मुलांना नक्की आवडेल

Tomato Soup Recipe: सूप हा एक असा पदार्थ आहे जो तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवणं किंवा रात्रीच्या जेवणातही घेऊ शकता. खास करून भाज्यांचे सूप Vegetable Soup हे पचायला हलके आणि फायबरयुक्त Fibre असल्याने सूपचं सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. Tasty Food Tips Tomato soup recipe for your Children

रोजच्या जेवणात विविध भाज्यांमध्ये आणि आमटीसाठी टोमॅटोचा वापर तर आपण करतो. पण याच टोमॅटोपासून बनलेले टोमॅटो सूप Tomato Soup देखील अगदी चविष्ट लागते.

टोमॅटो सूप घरातील लहान मुलांपासून मोठ्यांर्यंत सगळ्यांच्या पसंतीस पडेल असा पदार्थ आहे. डाएटसाठी Diet देखील टोमॅटोसूप हा एक उत्तम पर्याय आहे. तेव्हा पाहुयात टोमॅटो सूपची खास रेसिपी Tomato Soup Recipe

टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य

अर्धा किलो टोमॅटो, २ गाजर, १ बीट, १ इंचाचा आल्याचा तुकडा, ३-४ लसणाच्या पाकळ्या, १ कांदा, बटर, १ चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर १ चमचा, काळी मिरी अर्धा चमचा

टोमॅटो सूपची कृती-(how to make tomato soup at home)

  • टोमॅटो सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो तसचं गाजर, बीटचे तुकडे करून घ्यावे.

  • आता गॅसवर कुकर ठेवून त्यात बटर टाकावं.

  • बटर तापल्यावर त्यात २ तेजपत्ता, आलं आणि लसूण बारीक चिरून परतून घ्यावे. यानंतर यात सर्व भाज्या टाकून चांगल्या परतून घ्याव्या.

हे देखिल वाचा-

  • २ मिनिटांसाठी भाज्या चांगल्या परतल्यानंतर त्यात १ ग्लास पाणी टाकावं. अर्धा चमचा मीठ टाका. कुकुरचं झाकण बदं करून साधारण ४-५ शिट्या घ्याव्यात

  • गॅस बंद झाल्यानंतर ५ मिनिटांनी कुकरचं झाकणं उघडावं. त्यानंतर त्यातील तेजपत्ता काढून घ्यावा.

  • मिक्सर किंवा ब्लेंडरच्या मदतीने सर्व भाज्या चांगल्या ब्लेंड करून घ्याव्या.

  • भाज्या चांगल्या ब्लेंड झाल्यानंतर पुन्हा गॅस सुरू करा. यात अर्धा चमचा काळीमीर पूड टाका. तसचं त्यात लिंबाचा रस आणि १ चमचा साखर टाका.

  • २ मिनिटांसाठी सूप उकळू द्या. त्यांनर गॅस बंद करा.

अशा प्रकारे तुमचं टोमॅटो सूप सर्व्ह करण्यासाठी तयार होईल.

टोमॅटो सूपसाठी काही टिप्स

टोमॅटो सूप जर तुम्हाला घट्ट हवे असेल तर भाज्या उकडताना तुम्ही त्यात एक मध्यम आकाराचा बटाटा टाकू शकता. यामुळे सूप छान घट्ट होईल.

तसंच जर तुम्हाला सूप थोडं तिखट हवे असल्यास फोडणीत तुम्ही पाव चमचा लाल मिरची पावडर टाकू शकता. यामुळे सूपला छान आंबट, तिखट, गोड अशी चव येईल.

लहान मुलांसाठी सूप जर तुम्ही बनवत असाल तर सूप क्रिमी बनवण्यासाठी सूप तयार झाल्यानंतर त्यात सर्व्ह करण्यापूर्वी २-३ चमचे तुम्ही फ्रेश क्रिम टाकू शकता किंवा घरातील मलई किंवा दूध टाकू शकता. यामुळे सूप क्रिमी होईल आणि लहान मुलांना नक्कीच आवडेल.