Paneer Pakora Recipe: टेस्टी पनीर पकोडा खा, पहा सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paneer Pakora Recipe

Paneer Pakora Recipe: टेस्टी पनीर पकोडा खा, पहा सोपी रेसिपी

दररोज खाण्यात काहीतरी स्पेशल करावं, असं प्रत्येकाला वाटतं पण नेमकं काय करावं? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्ही पनीरच्या भरपूर डिश ट्राय केल्या असाव्यात आज आम्ही तुम्हाला पनीरची हटके रेसिपी सांगणार आहोत. पनीर पकोडा कसा करायचा.. चला तर जाणून घेऊया.

साहित्य:

 • पनीर

 • मैदास

 • तिखट

 • कॉर्न फ्लोअर

 • मीठ

 • चिली सॉस आणि सोयासॉस

 • तेल

हेही वाचा: Cutlet Recipe: टेस्टी अन् हेल्दी कटलेट्स खा, पहा सोपी रेसिपी

कृती

 • चिली सॉस आणि सोयासॉस एका मध्यम बाऊलमध्ये मिक्स करावे.

 • सुरवातीला पनीरचे तुकडे करावे.हे तुकडे चिली सॉस आणि सोयासॉसमध्ये ५ मिनीटे मॅरीनेट करून ठेवावे.

 • एका भांड्यात मैदा, मीठ आणि लाल तिखट आणि कॉर्न फ्लोअर मिक्स करावे.

 • पनीरचे मॅरीनेट केलेले तुकडे कॉर्न मैद्याच्या मिश्रणात घोळवून गरम तेलातून काढावे

 • तांबूस रंग येईपर्यंत छान तळावे.

 • पनीर पकोडे तयार होतील

 • हे पकोडे तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.