
गरमीच्या दिवसात तीन फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका
कोल्हापूर : सध्या घरामध्ये फ्रिज असणे ही एक बेसिक गरज आहे. फ्रिजमध्ये आपण फळे, भाजी किंवा अन्य बऱ्याच वस्तू ठेवतो. ज्या खराब होऊ नयेत म्हणून ठेवल्या जातात. हंगाम कोणताही असो, कोणताही पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा अधिक काळापर्यंत फ्रेश ठेवण्यासाठी फ्रीजचा उपयोग केला जातो. हिरव्या पालेभाज्या, फळे फ्रेश राहण्यासाठी याचा वापर होतो. परंतु बऱ्याच वेळा फ्रिज उघडल्यानंतर त्यामधून कुबट वास येतो. कदाचित तुम्हाला माहित असेल फ्रिजमध्ये काही फळे स्टोअर करून ठेवली जात नाहीत. काही फळे अधिक काळापर्यंत फ्रीजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. आज आम्ही अशा काही फळांची नावे सांगणार आहोत, जी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण ती फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर खाण्यासाठी योग्य राहत नाहीत. ती फळे कोणती हे पाहूयात..
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नये
बऱ्याच वेळा अनेकजण सफरचंद फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु असे करू नये. कारण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सफरचंदमध्ये एनजाईम्स ऍक्टिव्हचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेली इतर फळे अधिक पाक होतात. काही लोक तर सफरचंदाला डीप फ्रिजमध्येही ठेवतात. हे चुकीचे आहे अशावेळी तुम्ही सफरचंदला पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा रेफ्रिजरेटर ऐवजी दुसरे कोणत्याही थंड ठिकाणी ठेवू शकता.
केळी -
अनेक महिला बाजारातून खरेदी करून आणलेली केळी फ्रिजमध्ये ठेवतात. कदाचित तुम्हाला माहित नसेल केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती काळी पडतात. केळीमध्ये असलेले इथिएलिन गॅस फ्रिजमध्ये ठेवलेल्या साहित्याला नुकसान पोहोचवू शकते. यासाठी तुम्ही केळी कोणत्याही प्लास्टिकमध्ये रॅप करुन ठेवू शकता. यामुळे दुसरी फळेही सुरक्षित राहतात आणि जास्त काळासाठी फ्रेश राहतात.
लिची -
गरमीच्या दिवसात लिचीची आवक वाढते. त्यामुळे अनेक लोक ही खरेदी करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतात. पण हे करणे चुकीचे आहे. यामुळे लिचीचा वरीस भाग चांगला राहतो, परंतु आतील गाभा खराब होऊ शकतो. त्यामुळे लिचीला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी एका भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं केव्हाही उत्तम राहील.
Web Title: Three Fruits Not Stored In Refrigerator Effects On Health Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..