Til Chutney : वाढत्या थंडीपासून वाचण्याचा रामबाण आणि चविष्ट उपाय! तिळाची चटणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Til Chutney

Til Chutney : वाढत्या थंडीपासून वाचण्याचा रामबाण आणि चविष्ट उपाय! तिळाची चटणी

Til Chutney : दिवसेंदिवस थंडी वाढते आहे, लहानपणी थंडी वाढली की आजी काहीना काही काढे करून पाजायची, आई रोज गरम दूध आणि हळद पेयला लावायची. हे रुटीन काहींच्याकडे अजूनही सुरू असेल. हिवाळा हा जितका चांगला तितकाच वाईट कारण सोबत साथीचे अनेक आजार घेऊन येतो. यात अजून एक गोष्ट आहे जिच्या नियमित सेवनाने थंडीचा तितका त्रास होत नाही आणि ती म्हणजे तिळाची चटणी; बघूया याची रेसिपी.

हेही वाचा: Pravasi Bharatiya Divas 2023 : कोव्हिड नंतर साजरा होणार प्रवासी भारतीय दिवस; जाणून घ्या महत्व!

साहित्य:

1 वाटी पांढरे तीळ

1/2 वाटी शेंगदाणे

1 चमचा जिरं

1 चमचा बडीशेप

10-12 लसूण पाकळ्या

चवीनुसार मीठ

1 चमचा लाल तिखट

हेही वाचा: Breakfast Recipe : एगलेस ऑम्लेट खाल्ले आहे का? एकदा खाल तर अंड्याचे ऑम्लेट विसराल

कृती:

तीळ कढई किंवा पॅन मध्ये भाजून घ्या. तीळ भाजतांना हाथाने पाण्याचा थोडासा शिपका मारा. म्हणजे तीळ छान खमंग भाजले जातील. तीळ छान भाजले की एका ताटात काढून घ्या.

नंतर त्याच कढई मध्ये शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप सुद्धा भाजून घ्या.

हेही वाचा: Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

भाजेलेलं साहित्य एका ताटात घेऊन थंड करून घ्या. साहित्य थंड झालं कि मिक्सर च्या भांड्यात भाजेलेले तीळ, शेंगदाणे, जिरं आणि बडीशेप घ्या. लसूण ऍड करा.

चवीनुसार मीठ घाला. लाल तिखट घाला. आणि मिक्सरला सर्व साहित्य भरड सारखं वाटून घ्या.

आपली खमंग तिळाची चटणी तयात आहे. ही चटणी वरण भात, चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.