esakal | घरच्यांना Impress करायचं असेल तर, ही रेसिपी ट्राय कराच..

बोलून बातमी शोधा

घरच्यांना Impress करायचं असेल तर, ही रेसिपी ट्राय कराच..

घरच्यांना Impress करायचं असेल तर, ही रेसिपी ट्राय कराच..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आंबा असे एक फळ आहे जे साधारणतः गरमीमध्ये खूप चवीने खाल्ले जाते. एक फळ म्हणून याला पसंती दिली जाते. यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये आंब्याची चटणी असेल असे अनेक पदार्थ बनवले जातात. गरमीच्या दिवसात आंब्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याचे एक वेगळी मजा आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला आंब्याची इंडियन पद्धतीची नाही तर थाई रेसिपी सांगणार आहोत. ज्याच्या मध्ये ज्याचं नाव आहे मॅंगो स्टीकी राईस. मॅंगो स्टीकी राईस हा 'थाई डीजर्ट' लोकप्रिय पदार्थ आहे. ज्याला लोक मोठ्या आनंदाने खातात. या डिशला 'खाओ निओ मा मुआंग' असही म्हंटल जाते. याचा अर्थ आहे स्टीकी राईस थाई हे एक मुख्य व्यंजन आहे. चिकट भातासोबत नारळ, दूध, मीठ, रोस्टेड तेल, तीळ बिया यासोबत याला बनवले जाते. आपल्याला माहित आहे गरमीच्या दिवसांमध्ये भारतात खूप आंबे खूप प्रमाणात मिळतात आणि त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. तर तुम्ही या रेसिपीला यामध्ये सामील करून घेऊ शकता...

घरीच बनवा मॅंगो स्टीकी राईस

सुरुवातीला तांदळाला स्वच्छ धुऊन घ्या. आणि आठ तासांसाठी भिजत ठेवा. याला एका सुती कपडामध्ये ठेवून अर्ध्यावरती शिजवून घ्या. एका पॅनमध्ये नारळाचे दूध घाला. त्यामध्ये साखर, मीठ घालून मंद आचेवर ते गाढा होईपर्यंत शिजवून घ्या. स्टीकी राईस पूर्णपणे शिजेल्यानंतर त्यामध्ये नारळाचे दूध घाला. गार्निशिंगसाठी एक मोठा चमचा दूध बाजूला ठेवा. आंब्याला कापून घ्या. स्टीकी राईसला एका साच्यामध्ये घाला. आणि प्लेटमध्ये काढून घ्या. नारळाचे दूध आणि तीळाच्या बियांचा वापरा करा. तुमचा स्टीकी राईस कापलेल्या आंब्यासोबत खाण्यासाठी तयार आहे.