
Traditional Indian Prasad Recipe for Satyanarayan Katha: सध्या श्रावण महिना सुरु आहे. सगळ्या महिन्यांमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या या महिन्यात अनेक सण-उत्सव व्रतकैवल्य आणि पूजा पार पडतात. अनेकजण श्रावणातील उपवास करतात. तर या महिन्यात शंकर महादेवाची पूजा अगदी मनोभावे केली जाते. हा महिना शंकर महादेवासाठी अर्पण असतो. याच महिन्यात बहुतांश घरात अतिशय आनंदाने केली जाणारी सत्यनारायणाची पूजा देखी असते. प्रामुख्याने पती-पत्नी जोडप्याने केल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजेची खासियत म्हणजे या पूजेसाठी तयार केलेला प्रसादाचा शिरा.
नेहमी बनवतो त्यापेक्षा हा शिरा हमखास चवीला वेगळाच बनतो, त्यामुळे सगळेच याचा आस्वाद मनसोक्त घेतात. चला तर मग जाणून घेऊया सत्यनारायण पूजेचा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा.