Bread पासून तयार करा कुरकुरीत ब्रेड मसाला Kachori, चव चाखून सगळेच होतील खूश

ब्रेडपासून तयार करण्यात आलेली मसाला कचोरी ही चवीला अत्यंत स्वादिष्ट असते. तसंच झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही संध्याकाळी चहासोबत Tea सर्व्ह केल्यास तुमच्या घरातील नक्कीच खुश होतील
ब्रेडची कचोरी
ब्रेडची कचोरीEsakal

साधारण ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हनिंग स्नॅकमध्ये Snacks अनेक जण ब्रेडचा तसचं ब्रेडपासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांना पसंती देतात. नाश्त्यामध्ये ब्रेड बटर किंवा ब्रेड जाम खाणं लहानांपासून मोठ्यांनाही आवडतं. Try This Bread Kachori for Breakfast Marathi Food Tips

तसचं ब्रेडचे रोल, विविध सॅण्डविच, ब्रेड पकोडा Bread Pakoda, गार्लिक ब्रेड असे पदार्थही स्नॅक म्हणून अनेकजण मोठ्या चवीने खातात. मात्र तुम्ही कधी ब्रेडपासून तयार करण्यात आलेली कचोरी Kachori ट्राय केली आहे का?

ब्रेडपासून तयार करण्यात आलेली मसाला कचोरी ही चवीला अत्यंत स्वादिष्ट असते. तसंच झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही संध्याकाळी चहासोबत Tea सर्व्ह केल्यास तुमच्या घरातील नक्कीच खुश होतील. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी ब्रेड मसाला कचोरीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

ब्रेड मसाला कचोरीसाठी लागणारं साहित्य

एक मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जीर, १ चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप, ५-७ काळी मिरी, अर्धा लहान चमचा हिंग, १ चमचा आल्याचे बारीक तुकडे, १ चमचा बारीक चिरलेली मिरची, १ कप भिजवलेली उडदाची डाळ, १ लहान चमचा हळद आणि १ लहान चमचा लाल मिरची पावडर, जिरंपूड, १ चमचा गरम मसाला, आमचुर पावडर मीठ चवीनुसार

८-१० ब्रेड स्लाइस, १ उकडलेला बटाटा, अर्धा कप किसलेलं पनीर, कोथिंबीर आणि पाणी.

ब्रेड मसाला कचोरी बनवण्याची कृती

ब्रेड मसाला कचोरी तयार करण्यासाठी सर्वप्रथम या कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

ब्रेडची कचोरी
Matar Kachori Recipe: खायला खमंग खरपुस मटर कचोरी घराच्या घरी कशी तयार करावी?

कचोरी मसाला कृती-

सर्वप्रथम एका खलबत्यामध्ये जिरं, धणे. बडिसोप आणि काळीमिरी भरड वाटून घ्याव्या. तुम्ही यासाठी मिक्सरचा वापरही करू शकता.

आता एका कढईत १ चमचा तेल टाकावं. तेल तापल्यावर त्यात वाटलेले मसाले घालून मंद आचेवर परतावे.

मसाले परतल्यावर त्यात बारीक चिरललेली मिरची, हिंग आणि आल्याचे तुकडे घालून पुन्हा परता.

यानंतर यात भिजवलेली उडदाची डाळ घालावी.

आता यात मीठ, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला घालूव डाळ चांगली परतावी.

डाळीमध्ये ३-४ चमचे पाणी घालून. कढईवर झाकणं ठेवून ५-७ मिनिटं डाळ शिजू द्यावी.

डाळ शिजत आली कि त्यात किसलेला बटाटा घालून मिश्रण चांगलं मिस्क करा. थोडं पाणी शिंपडून पुन्हा २-३ मिनिटांची झाकण ठेवून वाफ घ्या.

आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आमचूर पावडर टाका आणि गॅस बंद करा.

अशा प्रकारे तुमचा कचोरीसाठी लागणारा मसाला तयार होईल.

अशी बनवा कचोरी

आता कचोरी तयार करण्यासाठी ब्रेड स्लाइसवर हलकं पाणी शिंपडा आणि त्या लाटण्याच्या मदतीने सपाट करून घ्या. एका वाटीच्या मदतीने ब्रेडचे गोलाकार आकार कापून घ्या. आता दोन स्लाइसच्या मध्ये मसाला भरून कडेने थोडं पाणी लावून दोन्ही स्लाइस चांगल्या बंद करा.

त्यानंतर पुन्हा एका कढईत कचोरी तळण्यासाठी तेल तापत ठेवा. तेल चांगलं तापलं की आच मध्यम ठेवून कचोरी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

अशा प्रकारे तुमच्या ब्रेड मसाला कचोरी तयार होतील. कचोरी पुदीना चटणी किंवा टोमॅटो केचअपसोबत खावू शकता. या क्रिस्पी आणि चटकदार कचोरी संध्याकाळी चहासोबत खाण्याची मजा तुम्ही कुटुंबियांसोबत लुटू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com