Brain Power Increase- Matcha tea Benefits: निरोगी हृदय आणि मेंदूची ताकद वाढवण्यासाठी करा Matcha Teaचं सेवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माचा टी

Matcha tea Benefits: निरोगी हृदय आणि मेंदूची ताकद वाढवण्यासाठी करा Matcha Teaचं सेवन

जगभरामध्ये जवळपास चहाचे Tea हजारो प्रकार आहेत. यात प्रत्येक देशात आणि तिथल्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या चहाचं सेवन केलं जातं. यातील काही प्रकार तुम्ही ट्राय केले असतील. Try Matcha Tea for healthy heart and Brain Power

काही चहाच्या प्रकारांबद्दल सोशल मीडियावरून Social Media तुम्हाला माहिती मिळाली असेल. खरं तर अलिकडे वजन कमी करण्यासाठी Weight Loss विविध चहाचे प्रकार ट्रेंडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. Try Matcha Tea for healthy heart and Brain Power

खास करून सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी आणि पदार्थ ट्रेंडमध्ये येत असतात. सध्या ग्रीन टी Green Tea किंवा हर्बल टी पिण्याकडे अनेकांचा कल असल्याचं दिसतंय. फिटनेससाठी Fitness किंवा वजन कमी करण्यासाठी अनेकजण ग्रीन टी तसचं हर्बल टीचं सेवन करतात. यापैकीच एक असा चहा सध्या चर्चेत आहे ज्याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर ऐकलं असेलच. हा चहा म्हणजे माचा टी (Matcha Tea).

माचा टी हे ग्रीन टीचं जपानी व्हर्जिन आहे. ग्रीन टी प्रमाणेच माचा टीचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरील इंफ्लुएंसर किंवा सेलिब्रिटींमुळे Matcha Tea चर्चेत आहे. आज आपण या माचा टीचे आरोग्यासाठी असणारे फायदे जाणून घेणार आहोत.

माचा टी नेमका काय आहे?

ग्रीन टी आणि माचा टी हे दोन्ही कॅमेलिया सायनेन्सिस या एकाच वनस्पतीपासून तयार जातात. ग्रीन टी हा या वनस्पतींच्या पानांना वाळवून तयार केला जातो. तर माचा टी बनवण्यासाठी पानं देठापासून वेगळी करून ती उकळवून वाळवली जातात त्यानंतर त्याची पावडर तयार केली जाते.

हे देखिल वाचा-

माचा टीचे फायदे

निरोगी हृदयासाठी- माचा टीमध्ये मुबलक प्रमाणात पोषकद्रव्य आढळतात. यातील एपिरॅलोकॅटेचिन-३-गॅलेट नावाच्या संगुयाचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. संशोधनानुसार माचा टीमध्ये अँटी- डायबेटिज, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्ससह अनेक आरोग्यादायी गुणधर्म आढळतात. यामुळे हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्दनुसार माचा टी ऊर्जा वाढवण्याचं काम करते. तसचं लिपोजेनेसिसि आणि अन्न पदार्थामधूल चरबीचं शोषण कमी करते. यामुळे शरीरात फॅट्स वाढत नाहीत. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टीपेक्षा माचा टी ही वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी आहे. जवळपास १२ आठवडे या चहाचं सेवन केल्यास शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

त्वचा चमकदार होईल- प्रत्येक स्त्रीला तिच्या त्वचेवर ग्लो दिसावा अशी इच्छा असते. यासाठी माचा टी उपयुक्त ठरू शकतो. संशोधनानुसार माचा टी त्वचेशी निगडीच अल्सर, सोरायसिस, रोसॅसिया आणि एक्टिनिक कोराटोसिसि यांसारख्या ट्रीटमेंटसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे या चहाच्या सेवनाने त्वचेच्या समस्या दूर होऊन त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

मेंदूसाठी फायदेशीर- माचा टीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक गुणधर्मांमुळे मेंदूचं कार्य सुधारतं. यामुळे एकाग्रता वाढण्यास तसचं स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात येईल- माचा टीमध्ये असलेल्या कॅटेचिन नावाच्या अँटीऑक्सिडंट्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यास मदत होते. या चहाचं नियमित सेवन केल्यास रक्तदाबाची समस्या कायमची दूर होऊ शकते.

डोळ्यांसाठी फायदेशीर- माचा टी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसचं दृष्टी चांगली होण्यासाठी उपयुक्त असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. माच टी मध्ये आढळणाऱ्या केचिनमुळे ग्लूकोमा आणि डोळ्यांशी संबंधीत इतर समस्या दूर करण्यास मजत होते.

कोलेस्ट्रॉलची समस्या होईल दूर- माचा टी मुळे HDL कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. म्हणून माचा टीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

या फायद्यांसोबतच पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील माचा टी उपयुक्त ठरतो. एकूण या चहामध्ये असलेल्या कॅटेनिन या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे एकूण आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते.

टॅग्स :Teamasala tea