तुम्हाला साउथ इंडियन डिश आवडते; तर ट्राय करा उडुपी स्टाईलचा मसाला राइस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

चला तर मग जाणून घेऊयात साउथ इंडियनमधील उडुपी स्टाईलच्या मसाला राइसची रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही नक्कीच ट्राय करून पहाल. 

पुणे : साउथ इंडियन डिशमधील ही एक अतिशय चविष्ट रेसिपी आहे. आपण ही रेसिपी दुपारच्या जेवणासह किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकता. या रेसिपीला मसाला भात ही म्हणतात. केरळ आणि कर्नाटकसारख्या दक्षिण भारताची राज्ये हे मसाल्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत.

या रेसिपीमध्ये विशेष मसाले नारळासह तयार केले जातात आणि शिजवलेल्या तांदूळामध्ये मिसळवले जातात. कर्नाटकातील हा मसाला राईस प्रत्येक सण आणि उत्सव दरम्यान बनवला जातो. चला तर मग जाणून घेऊयात साउथ इंडियनमधील उडुपी स्टाईलच्या मसाला राइसची रेसिपी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही नक्कीच ट्राय करून पहाल. 

हे ही वाचा : Malabar Fish Curry Recipe : घरच्या घरी बनवा तेही अगदी झटपट

साहित्य 

तांदूळ १७५ ग्रॅम
तेल ४ चमचे
हिरव्या मिरच्या
लाल तिखट १ टीस्पून
किसलेले नारळ
मोहरी, चिंच आणि गूळ
हरभरा डाळ ५० ग्रॅम
उडीद डाळ ५० ग्रॅम
मीठ
कोथिंबीर 

कृती : सुरवातीला कढईत तेल गरम करून त्यात लाल मिरच्या घाला. आता त्या मिरच्या तळून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात किसलेले नारळ, मोहरी, चिंच आणि गूळ घाला. हे सर्व एकत्र बारीक करून पेस्ट बनवा. त्यानंतर कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मोहरी, हरभरा डाळ, उडीद डाळ घाला आणि काही मिनिटे शिजवून घ्या. आता त्यात खिसलेले नारळ घाला आणि हे सर्व मिश्रण 3 ते 4 मिनिटे शिजू द्या. त्यानंतर हळद, हिंग, कढीपत्ता घाला. ही फोडणी तडतडल्यांनंतर नारळाची पेस्ट घाला आणि सर्व मिक्स करा. हे सर्व मिश्रण चांगले मिसळले की वरून शिजवलेले तांदूळ (भात) घाला आणि चमच्याच्या सहाय्याने चांगले मिक्स करा. मध्यम आचेवर दोन मिनिटे शिजवा. अशारितीने तुमचा उडुपी स्टाईलचा मसाला राइस (कोकोनट मसाला राईस) तयार आहे. हा एक सुवासिक दक्षिणेचा चव मिळतो जो आपण चाखल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यावरून बारीक चिरून हिरव्या कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

संपादन :  सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udupi style masala rice recipe