आता काय तर मोमोज आइस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले खायचं कसं?

दर आठवड्याला चित्र-विचित्र खाद्यपदार्थ सोशल मीडियावर शेअर होत आहेत
momo ice cream
momo ice creamgoogle

दर आठवड्याला चित्र-विचित्र खाद्यपदार्थ सोशल मीडियावर (Social Media) शेअर होत आहेत.विचित्र खाद्यपदार्थ (Food) करणे हा आता एक ट्रेंड बनला आहे, आज काय तर, मोमो आईस्क्रीम केले गेले आहे. ते पाहून नेटकरी वैतागले आहेत. भरीस भर म्हणजे हा रोल तुम्हाला शेजवान चटणीबरोबर खायला देतात. गेल्या आठवड्यात मसाला डोसा आइस्क्रीमच्या गारव्यातून अजूनही नेटकरी सावरलेले नाहीत. सोशल मीडियाच्या अशा विचित्र ट्रेंडचा नेटकऱ्यांना उबग आला आहे. (Weird Food Viral Video)

momo ice cream
Video : मसाला डोसा आइस्क्रीम रोल पाहून नेटकरी झाले गार

इस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक विक्रेता तीन वाफवलेले मोमो फोडून ते एकत्र मिसळताना दिसत आहे. त्यानंतर त्याने मोमोजमध्ये बर्फ आणि फ्लेवर्ड दुध, व्हॅनिला आइस्क्रीम टाकून ते चांगले एकत्र केले. त्याचा रोल करून तो शेजवान चटणीबरोबर खायला दिला. (Weird Food Viral Video)

momo ice cream
तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या

द ग्रेट इंडियन फूडी (thegreatindianfoodie)ने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना पीके मधील सोनू निगमच्या 'भगवान है कहां रे तू' गाण्याने व्हिडिओची सुरुवात होते. त्याने ही क्लीप शेअर करता , दिल्लीवाल्यांनो, तुम्ही असे प्रयोग का करता आहात? असे म्हटले आहे. (Weird Food Viral Video)

momo ice cream
खावं तरी कसं? फेरेरो रोचर मंचुरियन पाहून नेटकरी पडले पेचात

या व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे. काही लोकं तर आता जगाचा अंत जवळ आला आहे, तर काहींनी खरच लाज वाटते तुमची अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकं आता अशाप्रकारच्या पदार्थांची वाट लावणाऱ्या प्रकाराला कंटाळले आहेत. (Weird Food Viral Video)

momo ice cream
'हा' व्हिडीओ पाहून चहाप्रेमींना येईल राग; रुह अफजा टाकून बनवला गुलाबी चहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com