Viral Video | दुकानदाराने बनवला मॅगी आइस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shopkeeper made maggi ice cream rolls

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं.

Viral Video: दुकानदाराने बनवला मॅगी आईस्क्रीम रोल! नेटकरी म्हणाले...

सोशल मीडियावर (Social Media) रोज काही ना काही व्हायरल होत असतं. आजकाल मॅगीचे अजब प्रयोग (Weird Experiments) सोशल मीडियावर समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यामध्ये एक दुकानदार मॅगीवर (Maggi) प्रयोग करताना दिसत आहे. हा व्यक्ती 'मॅगी आईस्क्रीम रोल' (Maggi Ice Cream Rolls) बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत.

हेही वाचा: Viral Video : मित्रांसोबत पार्टीसाठी 'या' पठ्ठ्याने चक्क बुक केली मेट्रो!

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) एका दुकानदारानं मॅगीवर असा प्रयोग केला आहे, त्यानंतर लोकांना संताप आला आहे. सोशल मीडियावर या अनोख्या डिशचे व्हिडिओ पाहायला मिळत असले तरी ही डिश जरा हटके आहे. 'मॅगी आईस्क्रीम रोल' पाहून मॅगी आणि आईस्क्रीमप्रेमी संतापले आहेत.

मॅगी आइस्क्रीम रोलचा व्हिडिओ पाहून युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही पाहू शकता की दुकानदार मॅगीला आईस्क्रीममध्ये मिसळतो, नंतर तव्यावर त्याचा रोल बनवतो. 'मॅगी आईस्क्रीम रोल'पाहून लोक दुकानदाराला शिवीगाळ करत आहेत.

हेही वाचा: Viral Video : लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग...

हा व्हिडिओ thegreatindianfoodie नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबतच युझरने एक अँग्री कॅप्शन लिहिलं. युजरने लिहिले, "हा मॅगीच्या शक्तींचा गैरवापर केला जातोय, आई." मॅगीसोबतचा हा प्रयोग पाहून सोशल मीडियावर जवळपास सगळेच हैराण झाले आहेत. हा प्रयोग पाहून लोक संतापले आहेत. एका यूजरने हा प्रयोग पाहिला आणि लिहिले, "भाऊ, बस करा! ते हृदयाला लागतयं".