Viral Video : मित्रांसोबत पार्टीसाठी 'या' पठ्ठ्याने चक्क बुक केली मेट्रो!

हा व्हायरल व्हिडिओ पाहून युझर्सही आश्चर्यचकित झाले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Viral Video
Viral Videoesakal
Summary

हा व्हायरल व्हिडिओ पाहून युझर्सही आश्चर्यचकित झाले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

आपल्या आजुबाजूला मजा-मस्ती करणारे शौकीन तरुणवर्ग कधीही स्थळ आणि वेळ पाहत नाहीत, फक्त प्लॅन करताच बाहेर पडतात.असाच काहीसा प्रकार मुलांच्या एका ग्रुपने केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो पाहून एक मिनिटासाठी तुम्हालाही असं कसं होऊ शकतं असं वाटेल. या व्हिडीओमध्ये मुलांचा एक ग्रुप मेट्रोच्या आत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहून युझर्सही आश्चर्यचकित झाले असून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Video
Viral Video : लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग...

या व्हिडीओमध्ये मुलांचा एक ग्रुप रिकाम्या मेट्रोमध्ये मस्ती करताना दिसताहेत. व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक मुलगा मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करण्यासाठी संपूर्ण मेट्रो बुक केल्याचं सांगत आहे. तुम्ही कधी कुणाला संपूर्ण मेट्रो बुक करताना पाहिलं आहे का, कदाचित तुम्ही ते पाहिलं नसेल, तर मग तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल.व्हिडिओमध्ये एक मुलगा जयपूर मेट्रोची संपूर्ण ट्रेन बुक केल्याचं सांगताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्रथम आतील प्रवासापूर्वी ट्रेन साफ करताना दिसत होती. त्यानंतर व्हिडिओमध्ये केबिनच्या आतमध्ये एक दृश्य दिसत होते.

Viral Video
Viral Video : आईचे शब्द ऐकताच, दोन महिन्यांच्या बाळाची तत्पर प्रतिक्रिया...

व्हिडिओमध्ये मुलगा ड्रायव्हरला मेट्रो मागे-पुढे दाखवण्यास सांगत आहे आणि हा प्रकार घडला. यानंतर मुलगा इकडे तिकडे फिरून रिकामी मेट्रो दाखवत आहे. व्हिडिओत मुलगा म्हणतोय की, रात्रीचे 10 वाजले आहेत आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली आहे. त्यानंतर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत ट्रेनमध्ये चढतो. प्रवास सुरू झाला की मुलांच्या ग्रुपची मजाही सुरू होते. या काळात ते कधी जमिनीवर बसतात, तर कधी गेम खेळायला सुरुवात करतात.

त्यावेळी ती मेट्रो थांबते, तिथे ते सर्व जण टॉयलेटसाठी उतरतात. ही मुलं मागच्या ट्रेनमध्ये चढताच बंद डब्यात जेवण दिलं जातं. सर्व मुले ट्रेनच्या फरशीवर बसून खाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. यानंतर काही लोक सीटवर विश्रांती घेतानाही दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर युझर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com