पायनपल नंतर आता वॉटरमेलन पिझ्झाची क्रेझ! पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पायनपल नंतर आता वॉटरमेलन पिझ्झाची क्रेझ! पाहा व्हिडिओ

पायनपल नंतर आता वॉटरमेलन पिझ्झाची क्रेझ! पाहा व्हिडिओ

तुम्हाला पिझ्झा आवडतो का? तुम्ही हन्नी पासून चॉकलेटपर्यंत पिझ्झाचे वेगवेगळे टॉपिंग ट्राय केले असतील, पण आता आम्ही तुम्हाला टापिंग नव्हे तर एका वेगळ्या बेस बद्दल सांगणार आहोत. पिझ्झासाठी बेस म्हणून ब्रेड वापरण्या ऐवजी आता फ्रूट बेस वापरण्याचा नवा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर दिसत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले, फ्रूट बेस पिझ्झा!

काही दिवसांपूर्वी असाच पायनॅपल पिझ्झा हा फ्रूट बेस पिझ्झा व्हायरल झाला होता. या पिझ्झाला फूडी नेटीझन्सची खूप पसंती मिळाली होती.

हेही वाचा: पवारांच्या मित्राकडून मोदींचे कौतुक

नुकताच एका इन्स्टाग्राम युजरने वॉटरमेलन पिझ्झा कसा बनवायचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे. "मी तयार केलेला लोकप्रिय वॉटर मेलन पिझ्झा मला सोशल मिडियावर आणायचा होता ज्यामुळे जास्तीत जास्त ट्राय केले आहे.'' असे कॅपश्न देत ऑली पॅटरसन यांनी इन्स्टग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा: स्ट्रीट फूड खायची इच्छा होतीये? मग ट्राय करा आलू हंडी चाट

कसा तयार करायचा हा वॉटरमेलन पिझ्झा?

साहित्य: वॉटलमेलन, मॉझरेला चिझ, सॉसेजेस, बार्बिक्यू सॉस

पद्धत :

  1. एक वॉटरमेलन गोलकार आकारात कापून घ्या.

  2. पॅनमध्ये दोन्ही बाजूने प्रत्येकी 5 मिनिंट फ्राय करा.

  3. व्यवस्थित फ्राय केल्यानंतर बेसच्या एका बाजूला बार्बिक्यू सॉस पसरवा.

  4. आता सॉसेज आणि चीज अॅड करा.

  5. मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये ठेवून पिझ्झा बेक करून घ्या. त्यानंतर पिझ्झा स्लाईस कट करून वॉटरमेलन पिझ्झाचा आस्वाद घ्या.

हा व्हिडिओ सोशलमिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर कित्येक नेटीझन्सनी हा वॉटरमेलन पिझ्झा ट्राय केला आहे. तुम्हाला ट्राय करायला आवडेल?

Web Title: Watermelon Pizza Know About The Latest Food Trends Fruit Base Pizza

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Fruit Base Pizza