Make Your Weekend Special; Cook Dhaba Style Egg Palak Curry
sakal
Green Masala Anda Palak Curry Recipe: वीकेंडच्या दिवशी सगळ्यांची फरमाईश असते काहीतरी चटकदार, टेस्टी आणि रोजच्या पोळी-भाजी, वरण-भाताव्यतिरिक्त वेगळं खाण्याची. त्यातही पनीर, चिकन, मटण आणि अंड्याच्या भाज्यांमध्ये व्हेरिएशन्स ट्राय करण्यात सगळ्यांचा कल जास्त असतो.
तुम्हाला पण असंच वेगवेगळ्या डिशेस ट्राय करण्याची आवड असेल तर पुढे दिलेली झणझणीत हिरव्या मसाल्याची ही ढाबा स्टाईल अंडा पालक करी तुमच्यासाठीच. घरी किंवा बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून बनवता येणारी ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, म्हणून लगेच लिहून घ्या.