थंडीत खाण्यासाठी Weight Loss पराठे माहित आहेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paratha

थंडीत खाण्यासाठी Weight Loss पराठे माहित आहेत का?

थंडीच्या (Winter) दिवसात भूक जादा लागते. अशावेळी अवेळी खाणं, प्रमाणापेक्षा जादा खाण्याने वजन वाढण्यास सुरुवात होते. तुम्ही जर योग्य तो आहार आणि हेल्दी आहार घेतला तर निश्चितच वजन वाढणार नाही. यासाठी दिवसाची सुरुवात चहा काॅफीने करु नका. यामुळे मेटाबाॅलिझम वाढते. त्याएेवजी तुम्ही खाण्यात बदल करा. आज तुम्हाला तीन पराठ्यांविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही आणि पोटही भरेल. चला तर जाणून घेऊया या पराठ्याविषयी.

पराठा खाल्याने कसे होते वजन कमी

थंडीत सतत गरम खाण्याची इच्छा होते. पुरी, पराठे खाण्याची इच्छा होते. ज्यात जादा कॅलरीज असतात. यामुळे वजन वाढते. याउलट पराठ्यामध्ये फायबर, न्यूट्रिशन असते. यामुळे अतिरिक्त फॅट वाढत नाही. तुम्हाला अॅक्टीव्ह करण्यास मदत करतात.

मेथी पराठा

मेथीच्या पराठ्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहील. शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचा फायदा स्किनसाठी होतोच शिवाय केसांना देखील होतो. फायबर ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करतो. मेथीत असणारे अॅन्टी- इंप्लेमेंन्टरी तत्व शरीराला अनावश्यक आजारापासून दुर ठेवतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

पालक पराठा

थंडीत दिवसाची सुरुवात पालक पराठा खाऊन करा. यात व्हिटामीन बी,ई आणि पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नीशिअम असे पोषक तत्वे असतात. याशिवाय फायबरचे प्रमाण जादा असते. तुम्हची भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करेल.

कांदा पराठा

कांद्यात कोलेजन आणि व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात असते. शरीरातील इम्यून सिस्टिम चांगली ठेवण्यास मदत करतो. कांद्याच्या पराठ्याने वजन नियंत्रणात राहतेच शिवाय फिटनेस चांगला राहतो. त्यामुळे थंडीत कांदा पराठा खाल्ला पाहिजे.

पराठा बनवताना या टिप्स वापरा

- पराठा करताना जादा तेल किंवा तुपाचा वापर करु नका.

-पराठा तयार झाल्यावर त्यावर थोडे तुप घाला. यामुळे टेस्ट वाढेल शिवाय फॅट वाढणार नाही.

-पराठा दही सोबत खावा. दह्यात असणारे प्रोबायोटिक्स मेटाबाॅलिझम बुस्ट करतात. दही हा फॅट बर्नर आहे.

-पराठा बनवण्यासाठी मल्टीग्रेन आटा, ज्वारी, बाजरीचा वापर करा.

Web Title: Weight Los Winter Food Cooking Marathi Tips

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyleWinter'food
go to top