

Alia Bhatt Glowing Skin Secret Beetroot Salad Recipe that Helps Get Winter Glowing Skin Naturally
sakal
Alia Bhatt’s Beetroot Salad: हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे आणि पायाच्या टाचांना भेगा पडणे अशा समस्या अनेकांना भेडसावतात. हा त्रास सर्वसामान्य असला तरी सेलिब्रिटीजच्या बाबतीत मात्र तो फारसा जाणवत नाही. कारण थंडीची चाहूल लागताच ते आपल्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेऊ लागतात.
अशातच अनेकांना आलिया भटसारखा नैसर्गिक आणि हेल्दी ग्लो हवा असतो. तुम्हालाही असा नॅचरल निखार मिळवायचा असेल, तर तिची बीटरूट सॅलड रेसिपी नक्की करून पाहा. ही सॅलड त्वचेला तेज देण्यासोबतच शरीराच्या एकूण आरोग्यासही फायदा करून देते. त्यामुळे रोजच्या आहारात ही हेल्दी रेसिपी सामावून घेण्याचा नक्की प्रयत्न करा.