
Zomato करणार १० मिनिटात फूड डिलीव्हरी! कसं शक्य होणार वाचा
फुड डिलव्हरी अॅप झोमॅटो आता झटपट फूड डिलीव्हरी देणार आहेत. कंपनीने सोमवारी आपले नवीन फिचर आणले आहे. १० मिनिटात फूड डिलिव्हरी असे हे फिचर असून ते पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी याविषयी ट्विट करून माहिती दिली. ही सेवा फक्त जवळच्या ठिकाणांसाठी असेल असे त्यांनी म्हटले आहे. गोयल यांनी माहिती देताना १० मिनिटांची फूड डिलिव्हरी कशाप्रकारे काम करेल हे सांगितले आहे.
हेही वाचा: 2024 पर्यंत 'या' कंपनीत असतील 50 टक्के महिला कर्मचारी!
दीपिंदरने सांगितले की, या फिचरसाठी डिलिव्हरीच्या सुरक्षेसाठी आम्ही तडजोड करणार नाही. आम्ही डिलिव्हरी पार्टनवर लवकर डिलिव्हरी करण्यासाठी दबाव टाकत नाही. तसंच आम्ही उशीरा डिलिव्हरी केल्यास दंड आकारत नाही. कारण डिलिव्हरी पार्टनरला पदार्थ पोहोचवण्याच्या वेळेविषयी माहिती दिली जात नाही. आम्ही कोणाचाही जीव धोक्यात घालत नाही. सोशल मीडियावर अनेक लोकांनी 10 मिनिटांची डिलिव्हरी देण्याचे आश्वासन डिलिव्हरी पार्टनरसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दीपिंदर यांनी याविषयी ट्विटवर माहिती दिली आहे.
हेही वाचा: Height Increase Tips : या उपायांनी वाढेल Teen Agers ची उंची
Web Title: Zomato Will Deliver In 10 Minutes Know How Its Possible
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..