Thai Footballer Dies After Lightning Strike During Match
esakal
Thai Football Player Dies On Pitch After Lightning Strike : थायलंड येथील एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात २४ वर्षीय थाई खेळाडूचा वीज कोसळून मृत्यू झाला आणि डझनभर खेळाडू जखमी झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील Sungai Golok येथे हा सामना सुरू होता आणि अचानक वीज कोसळली. या घटनेचा Video व्हायरल झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५:३० च्या सुमारास घडली. संतीफाप स्टेडियमवर प्रादेशिक गोलोक एफए कप फुटबॉल स्पर्धेचा उपांत्य सामना अबू एक्स नॉन्ग सिरिन आणि सॅमकोल्ट यांच्यात मुसळधार पावसात सुरू असताना खेळाडूंवर वीज कोसळली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.