Ganesh Chaturthi 2023 : पेणमधील या बाप्पाने स्वप्नात सांगितलं, तुझी पितळेची वाटी चांदीची झालीय बघ, आता दिवस पालटतील

पेणमध्ये प्रसिद्ध आहे कणेकर घराणे, त्यांनीच स्थापिलेलं हे मंदिर आहे खास
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 esakal

Ganesh Chaturthi 2023 : १८ व्या शकताचा काळ होता. भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. त्या काळात पेणमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या एका गणेश मंदिरातील हा प्रसंग. संस्थापक कणेकर घराण्याला उतरती कळा लागली होती. चांदीच्या भांड्यात जेवणारे लोक आता पितळेलाही महाग झाले होते.

अशातच या घराण्यातील निस्सिम गणेश भक्त असलेल्या कणेकरांना बाप्पाने एक चमत्कार दाखवला. तो प्रसंग काय होता आणि कणेकर घराणे नक्की कोणते, त्यांनी स्थापन केलेल्या गणेशाबद्दल आपण माहिती घेऊयात.

साधारणतः सन १८५५ च्या दरम्यान ब्रिटीश राजवटीत या अतिसुंदर श्रीगणराज- मूर्तीची प्रतिष्ठापना प्रभू आळीत झाली. कणेकर कुटुंबातील एका कर्तबगार पुरुषाने या श्रीगणरायांची स्थापना केली. रामचंद्र केशव कणेकर हे या मंदिराचे निर्माणकर्ते असावेत, असे म्हणतात. हे दीर्घायुषी श्रीगणेशभक्त सन १९७०- ७१ साली निवर्तले. यांचा उमेदीचा काळ हा श्रीमंदिराच्या भरभराटीचा होता. (Ganesh Chaturthi 2023)

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Visarjan 2023: गणपतीचं विसर्जन का करतात? पाण्यातच विसर्जन का करतात? मनातल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...

रणदिवे- कणेकर घराणे

श्रीगणेश संस्थापक कणेकर घराणे हे शिवकाळ रणदिवे नावाने पुणे प्रांतात राहत होते. यांचे मूळ पुरुष अप्पाजी रणदिवे, हिशोब तपासनीस वा तद्संबधाने सेवाचाकरी चालू होती. शिवशाहीच्या उत्तरार्धात कब्जा प्रकरणाला कंटाळून हे घराणे वाईजवळ कृष्णेच्या किनारी स्थलांतरीत झाले. हे कुटुंब कृष्णामाईच्या सेवेत आले.

अशी सव्वाशे वर्षे लोटली. पेशवाई लयास गेल्यानंतर ब्रिटीश राजवट सुरू झाली. ब्रिटीशांकडून या घराण्याला रायगड प्रांतातील कणे नावाचे गाव इनाम मिळाले. पुन्हा वाई सोडण्याचा प्रसंग आला. कणे गावच्या इनामावरून जनमानसात रणदिवेंऐवजी कणेकर इनामदार ठरले. नंतर त्यांनी कणेकर हेच उपनाम धार केले.

सन १८३० नंतर या घराण्याने पेण हे मुकामाचे स्थान निश्चित केले. पेणमध्ये ज्या पुरुषाची संपूर्ण हयात गेली ते केशव कणेकर हे असावेत. यांचे चिरंजी रामचंद्र यांच्या काळात हे घराणे पेणमध्ये पूर्ण स्थिरस्थावर झाले होते. त्याव सन १८५५ नंतर या श्रीगणेशांची स्थापना करण्यात आली.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Festival 2023 : विघ्ननाश आणि बुद्धिप्राप्ती! शास्त्रात ५ देवतांची उपासना का सांगितली जाते? इथे वाचा

श्रीगणराजमूर्तीचा नेमका प्रतिष्ठापना दिन आज निश्चितपणे सांगत येत नाही. पहिल्यापासून माघी गणेशोत्सव साजरा करण्याची जी प्रथा आहे ती आजतागायत सुरू आहे. उत्सवाचे स्वरूप कालमानानुसार बदलले आहे इतकेच पूर्वीचे वैभव लोप पावले आहे.

कुटुंबाचा विस्तार जसा होत जातो तसा कुटुंबाच्या वैभवाचे कारण असलेल्या देवतेकडेच त्या कुटुंबाचे दुर्लक्ष होते, असा प्रकार अनेक स्थानांबाबत आढळून येतो, तसे इथे झाले आहे.

मोहिनीराज कणेकर

कणेकर घराण्यातील हे कर्तबगार श्रीगणेशोपासक सन १९७१ च्या दरम्यान गेले. यांचा जन्म सन १८८५ च्या आसपासचा रामचंद्र कणेकरांचे हे चिरंजिव. यांनी या स्थानाचे वैभव बरेच वाढवले होते. कालपरत्वे आर्थिक परिस्थिती बिघडली असता. यांच्या जीवनामध्ये एक अजब घटना घडली.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Visarjan 2023 : पर्यावरणपूरक विसर्जनाला मुंबईकरांची पसंती!
मंदिरातील आकर्षक गणेशमूर्ती
मंदिरातील आकर्षक गणेशमूर्तीesakal

मोहिनीराजांच्या नातवाची मुंज होती. त्याचे निमंत्रण देण्यासाठी गणेशांना नैवेद्य दाखवताना, त्यांना पितळीच्या वाटीचा वापर करावा लागला. ते म्हणाले, आज 'आज आपली परिस्थिती नाही, वैभवसंपन्नता प्राप्त होताच चांदीच्या वाटीतून नैवेद्य दाखवू, असे ते म्हणाले आणि माघारी फिरले.

त्या दिवशी एक अजब प्रसंग घडला. मोहिनीराज हे झोपी गेले असता त्या त्यांना श्रींनी दृष्टांतात सांगितले. 'उठ आणि देवळात जा. खडबडून उठलेल्या या भक्ताने मंदिरात धाव घेतली व पाहतात तो काय नर पितळीच्या वाटीचे चांदीच्या वाटीत रूपांतर झाले होते!

यामुळे भारावून गेलेल्या मोहिनीराजांची श्रीगणरायांवर अपार श्रद्धा बसली. त्यांनी उपासनेचे बळ वाढविले. यांच्या पश्चात मात्र उत्सवाचे स्वरूप बदलून गेले होते. माघी गणेशोत्सवामध्ये पहिल्या दिवशी साधा नैवेद्य तर पंचमीला मश पंचपक्वान्नाचा नैवेद्य होतो. उकडीचे मोदक, बेसनचे लाडू, खाजाचे कानोले पुरणादी पदार्थांचा बहारदार बेत असतो.

(संंबंधित माहिती संजय वेंगुर्लेकर यांच्या 'आडवाटेचे श्रीगणपती'या पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com