Ganeshotsav 2022 : 'सुखकर्ता दुखहर्ता' आरती म्हणतो पण अर्थ माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : 'सुखकर्ता दुखहर्ता' आरती म्हणतो पण अर्थ माहितीये?

गणेश हे बुद्धी ज्ञान, व नव्या प्रारंभाचे हिंदु दैवत आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात असू दे नाहीतर कोणतेही धार्मिक कार्य, प्रत्येक वेळी गणपतीची आरती केलीच जाते. त्यातही मराठी भाषिकांमध्ये सुखकर्ता दुखहर्ता हीच आरती केली जाते. त्यामुळे घरा घरात अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनाच ही आरती पाठ असते. पण चालीच्या ओघात बऱ्याच चुका करत आरती म्हटली जाते. अनेकांना आरतीचा अर्थ माहित नसतो. या आरतीचा इतिहास, योग्य शब्द आणि अर्थ जाणून घेऊया.

आरतीचा इतिहास

पुण्यातील अष्टविनायकांमधील एक, मोरगावातील मयुरेश्वर या गणपतीची मूर्ती पाहून ही आरती लिहिण्याची प्रेरणा समर्थ रामदासांना मिळाली असे मानले जाते. ही आरती जोगिया ह्या रागात रचली आहे. अन्य आरतींप्रमाणे हीसुद्धा, प्राचीन मंत्रांप्रमाणे संस्कृतमध्ये लिहिलेली नसून, तिची रचना देशी भाषेमध्ये केली गेली आहे

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ ||

अर्थ: या पहिल्या ओळीतील पहिले दोन शब्द म्हणजे आनंद देणारा आणि दु: खाचा नाश करणारा. विघ्नाची वार्ता म्हणजे, नूरवी शिल्लक ठेवत नाही, तर प्रेम पुरवते ज्यावर कृपा आहे. त्याला सिंदूर आणि मोत्यांच्या माळांनी सजवण्यात आले आहे. अशा मंगलमूर्ती गणेशाचे ध्रुवपदात स्वागत केले जाते.

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंकुमकेशरा |

हिरे जडित मुकुट शोभतो बरा |

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||

अर्थ: केवळ त्याचे दर्शन घेतल्याने मनातील कामना, इच्छा इत्यादी पूर्ण होतात. पार्वतीच्या या मुलाने दागिना घातला आहे, तो सुगंधी चंदन आणि लाल केशराने सजला आहे. हा गणपती डोक्यावर हिऱ्यांनी जडलेला मुकुट घालून सुंदर सजला आहे. तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.

लंबोदर पितांबर फनी वरवंदना |

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |

दास रामाचा वाट पाहे सदना |

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||

अर्थ: मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला. रामदास घरी बसून गजाननाची वाट पाहत आहेत. आणि निर्वाणीचे संरक्षण करण्यासाठी, निर्वाणीच्या या क्षणी स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ते जोडून पुष्टी केली जाते. अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना