।। श्री दत्ताची आरती ।।

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

।। श्री दत्ताची आरती ।।

।। श्री दत्ताची आरती ।।

त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा । 
त्रिगुणीं अवतार त्रैलोक्‍यराणा । 
नेति नेति शब्दें न ये अनुमाना । 
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ।।1।। 
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता । 
आरती ओवाळितां हरली भवचिंता ।।धृ.।। 
सवाद्य अभ्यंतरी तूं एक दत्त । 
अभाग्यासी कैंची कळेल ही मात । 
पराही परतली तेथें कैचा हा हेत । 
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ।।2।। 
दत्त येऊनिया उभा ठाकला । 
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला । 
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला । 
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।3।। 
दत्त दत्त एसैं लागले ध्यान । 
हारपले मन झालें उन्मन । 
मीतूंपणाची झाली बोळवण । 
एकाजनार्दनी श्रीदत्तध्यान्य ।।4।। 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lord Dattatray Aarti