esakal | दक्षिण कोरियात मराठी कुटुंबांचा गणेशोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

दक्षिण कोरियात मराठी कुटुंबांचा गणेशोत्सव

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव : दक्षिण कोरिया मध्ये असलेल्या मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन श्री गणेशाची स्थापना करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे. गणपतीला प्रसाद म्हणून खास उकडीचे व खव्याचे मोदक केले आहे.

दक्षिण कोरियातील इंच्योन शहरात नोकरी निमित्ताने असलेले महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठी कुटुंबे एकत्र येऊन २०१९ पासून गणेशोत्सव साजरा करत आहे याही वर्षी अवसरी खुर्द (ता. आंबेगाव ) येथील दीक्षा पाटील - शिंदे व डॉ. संतोष पाटील (कोल्हापूर) या दांपत्याने पुढाकार घेत भारतातून गणेशाची मुती मागवून घेतली त्याची प्रतिष्ठापना केली आहे पाटील दांपत्याबरोबर चैताली पावसे, डॉ. गौरव थोरात (संगमनेर) व डॉ. वडियार (सांगली) यांनी गणपती पुढे छान आरास केली आहे.

हेही वाचा: सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

डॉ. संतोष पाटील कोरियातील गणेशोत्सवाबाबत बोलताना म्हणाले आम्ही पूर्ण १० दिवस गणेशोत्सव साजरा करतो या कालावधीत उकडीचे व खव्याचे मोदक, पुरी, पुरणपोळी, हरभराबटाट्याची भाजी, साजूक तुपातील शिरा, भजी , वरणभात अशा प्रकारे महाराष्ट्रीन पदार्थ करतो,अगदी भारता प्रमाणे इथे सर्व विधी करतो दररोज सकाळ संध्याकाळी आरती घेतो आरतीला जवळचे नागरिक बोलावतो या दहा दिवसात मराठी कुटुंबाबरोबर कोरियात असलेल्या इतर देशातील मित्र मैत्रीनाही आम्ही आवर्जून बोलावतो त्यामुळे आपली संस्कृती त्यांना समजते भारता बाहेर असूनही भारताप्रमाणेच सर्व प्रकारचे हिंदू सणवार, चालीरीती रूढी परंपरा हे सगळ जपायला आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले .

loading image
go to top