Ganeshotsav 2022 : 'यूपी'त साकारतोय १८ फूटी 'स्वर्ण गणेश' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : 'यूपी'त साकारतोय १८ फूटी 'स्वर्ण गणेश'

कोविडच्या दोन वर्षांच्या लॉक डाऊन नंतर या वर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे, संपूर्ण देशात या उत्साहाची लाट पसरलेली दिसते. गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग सुरू असताना आपली गणेशमूर्ती कशी असावी याचे प्लॅनिंगही जोरदार असते. उत्तर प्रदेशातील चंदूसी इथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी १८ फूट उंच सोन्याची गणेश मूर्ती साकारण्यात येत आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 ...अशी ओळखा मातीची गणेश मूर्ती

कशी आहे मूर्ती

यूपी मधल्या चंदूसी इथे हा १८ फूट उंच स्वर्ण गणेश साकारण्यात येत आहे. या गणरायाचे दागिने सोन्याचे करण्यात येत आहे. तिरूपती बालाजीच्या धरतीवर या गणपतीला साकारण्याच येत असल्याची माहिती या प्रोजेक्टशी संबंधीत अजय आर्य यांनी दिली आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : आंब्याच्या पानांनी करा बाप्पाचा श्रृंगार, होईल धन लाभ

या १८ फूटी गणपती मूर्तीच्या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळत आहे. या मूर्तीच्या ४० ते ५० टक्के सोने वापरण्यात येणार असून बाकी इतर धातूंचा यात वापर करण्यात आला आहे. यावरच्या दागिन्यांमध्ये अगदी रेखीव काम करण्यात आले आहे. मुंबई-पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह जग जाहीर असला तर संपूर्ण देशात या उत्सवाला खूप प्रेमाने साजरा केला जातो.

Web Title: 18 Feet Gold Ganesha At Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..