Ganeshotsav 2022 : आंब्याच्या पानांनी करा बाप्पाचा श्रृंगार, होईल धन लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : आंब्याच्या पानांनी करा बाप्पाचा श्रृंगार, होईल धन लाभ

यंदा गणेशोत्सव ३१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. १० दिवसांचा हा उत्सव घरात आनंद आणि सुख घेऊन येतो. काही खास गोष्टींनी बाप्पाची सजावट केल्याने काही विशेष फळ मिळते. ते फार लाभदायी मानले जाते व इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.

आंब्याची पाने

घराच्या दारावर आंब्याची पाने लावल्याने घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर सकारात्मक ऊर्जा घरात येते. तसच बाप्पाच्या भोवताली आंब्याच्या पानांची सजावट केल्याने घराच्या उत्पन्नात कधी कमतरता येत नाही. घर कायम धन-धान्याने भरलेले राहते.

जास्वंदिचे फूल

जास्वंदिचे फूल घरातली सर्व नकारात्मक उर्जेला सकारात्मकतेत बदलते. बाप्पाला जास्वंदिच्या फूलाने सजवल्याने व्यवसायात प्रगती होते.

कडूलिंबाची पाने

कडूलिंबाची पाने फार शुभ मानले जातात. कडूलिंबाच्या काड्यांच्या समिधा घालून होम केल्याने शनिचा क्रोध कमी होतो व ते मुलांवर कृपादृष्टी टाकतात असे मानले जाते. कडूलिंबाच्या पानांची सजावट केल्याने निगेटिव्हिटी कमी होते. कुटूंबात प्रेम व विश्वास वाढतो.