esakal | ग्रामीण भागातही आर्टिफिशल फुलांचे लोण; हार व तोरणांनी दुकानं सजली
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातही आर्टिफिशल फुलांचे लोण; हार व तोरणांनी दुकानं सजली

झेंडूच्या कलात्मक व आकर्षक कृत्रिम फुलांना ग्रामीण भागातीलही ग्राहक पसंती देत आहेत.

ग्रामीण भागातही आर्टिफिशल फुलांचे लोण; हार व तोरणांनी दुकानं सजली

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा): कोरोनाचा संसर्ग, लॉकडाउनमुळे गेल्या वर्षापासून झेंडूचे क्षेत्र कमी झाल्याने झेंडूच्या कलात्मक व आकर्षक कृत्रिम फुलांना ग्रामीण भागातीलही ग्राहक पसंती देत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या साहित्याची दुकाने आर्टिफिशल झेंडूसह अन्य फुलांनी सजल्याचे चित्र परिसरातील बाजारपेठांतून दृष्टीला पडत आहे.

हेही वाचा: साताऱ्यासह कऱ्हाडात धुवांधार; ढेबेवाडी खोऱ्यातील महिंद धरण 'ओव्हरफ्लो'

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर आलेल्या मर्यादा याचा परिणाम झेंडू पिकावर झाला. क्षेत्रात मोठी घट झाल्याचे दिसते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या खरेदी-विक्रीतून होणारी मोठी उलाढाल कमी झाली असून आर्टिफिशल फुलांचा वापर वाढल्याचे दिसते. अनेक व्यावसायिकांनी कृत्रिम झेंडूच्या फुलांच्या माळा व हार बनवून विक्रीस ठेवल्या असून परवडण्याजोगे दर असल्याने मागणीही चांगली आहे.

हेही वाचा: 'आला रुग्ण की पाठवा कऱ्हाडला'; ढेबेवाडी 'आरोग्य'त 14 वर्षांनंतरही सुविधांची वानवाच!

ढेबेवाडी विभागात सध्या गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ढेबेवाडी, तळमावलेसह अन्य लहान-मोठ्या बाजारपेठांत गर्दी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गावोगावी बैठकांचा सपाटा लावला आहे. कोरोनाच्या काळात उत्सव साजरा होत असल्याने नियमावली समजावून सांगत 'एक गाव, एक गणपती' साठी मंडळांना आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा: बांधकाम विभागाचे पितळं पडलं उघडं; ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर चर बुजविण्याचा दिखावाच!

पिवळ्या-केशरी झेंडूंसह गुलाब, निशिगंध, जरबेरा, मोगरा, लिली आदी आर्टिफिशल फुले व पानांना मागणी वाढतेय. ग्राहक फुलांच्या लडी किंवा तयार हार व माळा खरेदी करत आहेत. दरही परवडण्याजोगे आहेत.

- अमित पाटील, व्यावसायिक

loading image
go to top