esakal | बेळगावात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

belgaon

बेळगावात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आला असल्याने बुधवारी (ता. ८) बाजारपेठेमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाली. यामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागला.

सजावट साहित्याने गजबजलेल्या मारुती गल्ली, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, बापट गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी गल्या नागरिकांच्या गर्दीने भरगच्च झाल्या होत्या. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने खरेदीचा देखील उत्साह असल्याने बाजारपेठेत गजबज आहे. बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे मात्र कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होण्याची गंभीर बाबदेखील घडत असल्याने अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने बाजारात सजावटीचे साहित्य तसेच गणेशमूर्तींचे स्टॉल्स लागले आहेत.

हेही वाचा: मुंबई : पोलीसांनी वृद्धेला साडी, चोळी देऊन केले मुलांच्या हवाली

यंदा बाजारात सजावट साहित्यही मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून ग्राहकांना आकर्षित करीत आहे. बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, थर्माकोलचे मखर, नानाविध रंगाचे आकर्षक लायटिंग आणि मखमली कापडांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. दिवसभर बाजारपेठेत खरेदीसाठीची झुंबड उडाली होती. खरेदीचा उत्साह एकीकडे असला तरी कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचेही दिसून आले. बाजारात गणेश सजावटीचे साहित्य तसेच गणेशमूर्तींचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात लागले आहेत.

वाहतूक कोंडीची समस्या

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिक एकदाच बाजारात आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी दिसून आली. यामुळे नार्वेकर गल्ली, मारुती गल्ली, शनिवार कुट, खडेबाजार, गोंधळी गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, कडोलकर गलली, चित्रा टॉकीज, नाथ पै सर्कल, खडेबाजार शहापूर, कपिलेश्र्वर उड्डाणपुल आदी ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले.

loading image
go to top