esakal | पर्यावरणपूरक गणेशात्सव करा साजरा; पोलिसांचं मंडळांना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

police

पर्यावरणपूरक गणेशात्सव करा साजरा; पोलिसांचं मंडळांना आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई (सातारा) : कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येत असल्याचा अंदाज तज्‍ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाच्या सर्व निर्बंधाचे पालन करावे. पर्यावरणपूरक व साध्या पद्धतीने उत्सव साजरा करून शहराची सांस्कृतिक परंपरा व पावित्र्य जपावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले.

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल सावंत होते. श्री. भरणे म्हणाले, ‘‘शहरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी रस्त्यावर मंडप घालू नये. खासगी व बंदिस्त जागेत गणेशमूर्तीची स्थापना करावी. वाद्य, डॉल्बी, डीजे वाजविण्यास तसेच आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी आहे. सार्वजनिक मूर्ती चार फूट व घरगुती दोन फूट असावी. गणेश मंडळांची ऑनलाइन नोंदणी करावी. रक्तदान, आरोग्य शिबिर, परिसर स्वच्छता असे सामाजिक व प्रबोधनपर उपक्रम राबवावेत.’’

हेही वाचा: बुलढाणा : बैल धुण्यासाठी गेलेल्‍या तरुणाचा बुडून मृत्यू

श्री. सावंत म्हणाले, ‘‘पालिकेच्या वतीने कृष्णा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्याचे नियोजन करण्यात आले असून याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. भाविकांनी पालिकेच्या मूर्तीदान व निर्माल्य दान उपक्रमास सहकार्य करावे. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे उत्सवापूर्वी भरण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.’’ काशिनाथ शेलार, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, सतीश वैराट, महेंद्र धनवे, अमित सोहनी, अजित शिंदे आदींनी सूचना मांडल्या.

loading image
go to top