नाशिक : चांदीच्या गणपतीला ब्रिटीशकालीन इतिहासाचा वारसा!

chandicha ganpati
chandicha ganpatiesakal

नाशिक : रविवार कारंजा (ravivar karanja) म्हटलं की, चांदीचा गणपती (chandicha ganpati) हे समीकरण ठरलेलं.... . रविवार कारंजा हा बाजारपेठेचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे ९० वर्षांपासून गणपती मंदिर आहे. पण १९७८ साली या मंदिरात चांदीचा मूर्ती बसविण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला (ganesh festival) सार्वजनिक स्वरुप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रीय भाग घेतला

या गणपतीबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरावर ब्रिटिश पोलिसांची करडी नजर होती. सन १९७८ साली रविवार कारंजा मित्र मंडळाने गणपतीची पूर्ती चांदीची बसविण्याचा निर्णय घेतला. तेव्हा परिसरातील व्यावसायिक, नाशिक मंडळाचे हितचिंतक आणि भाविक यांनी एकत्र येऊन चांदीचा गणपती बनविण्याची संकल्पना उचलून धरली. सर्वांच्या हातभारातून चांदीची मूर्ती साकारली.

chandicha ganpati
पिंपळाच्या झाडाखालील बाप्पा ते मंदिराच्या नगरीतील गणेश, जाणून घ्या महत्व

तेव्हापासून रविवार कारंजा मित्रमंडळाचा गणपती सर्व नाशिककरांचे आकर्षण ठरू लागला. हळूहळू नंतर गणपतीची महती सर्वदूर पोहोचली आणि सर्व गणेशभक्तांच्या दृष्टीने या मूर्तीला महत्त्व प्राप्त झाले.



रविवार कारंजा मित्रमंडळांना अनेक संस्था व व्यक्तींकडून मदत मिळते. या मदतीचा वापर मंडळ सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी करत आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाने राबविले आहेत.

आता निराधार मुलांसाठी निवारागृह, वृध्दाश्रम बांधण्याचा संकल्प हे. महानगरपालिकेकडून जागा मिळण्याची मंडळास प्रतीक्षा आहे. मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिराशी या मंडळाची संलग्नता आहे.

धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणार्‍या या मंडळाचा चांदीच्या गणपती नाशिकमध्ये मानाचा मानला जातो. पुण्यातील दगडूशेठ हलवाईचा गणपती जसा प्रसिध्द आहे. त्याप्रमाणे नाशिकचा हा चांदीचा गणपती प्रसिध्द आहे. हा गणपती पाहण्यासाठी गणेशोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या गणपतीच्या मूर्तीत दरवर्षी चांदीची भर टाकली जाते. वाढतावाढता वाढे या उक्तीप्रमाणे आज २०१ किलो चांदीचा गणपती पहावयास मिळतो.

(स्रोत - वेबदुनिया मराठी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com