सांगलीच्या मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापना; दीडशेहून आधिक वर्षाची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli ganpati

Ganeshotsav 2022: सांगलीत चोर गणपतीची प्रतिष्ठापना; दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा

सांगलीचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्री गणेश मंदिरामध्ये चोर गणपती बसवण्याची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदर चार दिवस या गणरायाची प्रतिस्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात गणपतीचे आगमन होते. पण गणपतीचे आगमन होण्याआधी याची माहिती कोणालाही दिली जात नाही म्हणून तर या प्रथेला चोर गणपती असे म्हणतात. रविवारी पहाटे या गणरायाची स्थापना करण्यात आली. शंभर वर्षापासून ही प्रथा सांगलीत पाळली जाते. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या चोर गणपतीच्या मूर्ती गणेश उत्सव झाल्यानंतरही जपून ठेवल्या जातात.

गणपतीची अनेक रुपे, अनेक अवतार ज्ञात आहेत. एकदंत, वक्रतुंड, दशभुजा, लंबोदर, त्रिशुंडी अशा एक ना अनेक नावांनी गणपती परिचित आहे. पण सांगलीतील हा प्रसिद्ध चोर गणपती पंचायतन संस्थानच्या गणेश उत्सवात चोर गणपतीचे अनोखे रूप आपणास पाहावयास मिळते. तसेच अनेकांच्या मनात अशी शंका येते की, सर्वांच दुख; हारणारा गणपती चोर कसा असेल तर त्याच उत्तर आहे हा गणपती चोर पावलांनी म्हणजेच हळूच येऊन बसणारा गणपती आहे.

सांगलीचे आराध्यदेवत असणा-या श्री गणपती मंदिरातील पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव दरवेळी सर्वांच आकर्षण ठरतो. लाखो भाविकांच्या जनसागरात संपन्न होणा-या या गणेशोत्सवास दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो.

चोर गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण. गणपती मंदिरातील संस्थान गणशोत्सवाची सुरूवात 'चोर गणपतीच्या आगमनाने होते. भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील या गाभाऱ्यात दोन्ही बाजूस चोर गणपतीच्या मूर्ती विधीपूर्वक बसविल्या जातात; मग येथून पंचमीपर्यत अर्थात पाचव्या दिवसांपर्यत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. चोर गणपतीचा सभामंडप विद्युत रोषणाईने झगमगून गेलेला असतो.

Web Title: Chor Ganapati In The Temple Of Sangli A Tradition Of More Than 150 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..