esakal | Ganesh Chaturthi 2021: 24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival in Godavari Express

24 वर्षात पहिल्यांदाच हुकली बाप्पांची मनमाड-मुंबई वारी!

sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : यंदा गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी मनमाड रेल्वे यार्डात एका बोगीत गणपती बाप्पाची साधेपणाने स्थापना केली. त्यामुळे २४ वर्षात प्रथमच गणपती बाप्पाची गणेशेत्सवात मनमाड - मुंबई रेल्वे वारी हुकली आहे.


सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट दिसून आले. सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने घालण्यात आली. यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे मोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची कमी झालेली दिसली. एकीकडे सार्वजनिक गणपती मंडळ साधेपणाने उत्सव साजरा करणार असले तरी दुसरीकडे घरगुती गणेश मूर्ती बसविण्याची लगबग दिसून आली. कोरोना संसर्ग परिस्थिती उद्‌भवल्याने कोणताही डामडौल न करता, कोणालाही त्रास होऊ न देता आणि सारासार विचार करून परंपरेला साजेसा गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिसून आला. मनमाड ते नाशिक व नाशिक ते मुंबई असा प्रवास शेकडो चाकरमाने करीत असतात. त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा, या उद्देशाने प्रवासी संघटनेतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजतगाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात येते. यंदा मात्र कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने साध्या पद्धतीने मनमाडच्या रेल्वे वॉर्डात एका बोगीत गणरायाची साधेपणाने स्थापना करण्यात आली. माजी आमदार ॲड. जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते गणपतीची आरती, तर प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नरेंद्र खैरे यांच्या हस्ते पूजाविधी करत गणरायाची स्थापना करण्यात आली. पुढील दहा दिवस रेल्वेच्या यार्डातच गणपतीची आराधना करण्यात येणार असल्याचे गणेशोत्सवाचे अध्यक्ष विवेक शेजवळ यांनी सांगितले. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे यावेळी चाकरमान्यांनी गणपती बाप्पाकडे घातले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीत एक लाख दुबार नावेगोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

राज्यात श्री गणरायाचे आगमन होत असून, सलग दुसऱ्या वर्षी गणपती उत्सवावर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे. दरवर्षी मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करणारे चाकरमाने धावत्या एक्स्प्रेसमध्ये गणरायाची स्थापना करतात. यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. दरम्यान, बंद असलेली गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.

निलमणी मूर्तीची स्थापना

मनमाड शहरातील मानाच्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा कोरोना संकट पाहता सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने श्री निलमणी मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावर्षीही स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्याचे विश्‍वस्त नितीन पांडे, किशोर गुजराथी यांनी सांगितले. ट्रस्टतर्फे श्री निलमणीची महाआरती दररोज रात्री आठला ‘श्री निलमणी गणेश मंदिर मनमाड’ या फेसबुक पेजवरून गणेश भक्तांना लाईव्ह पाहता येणार आहे.

हेही वाचा: अंजीरवाडी गणेशोत्सवात छगन भुजबळांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा

loading image
go to top