esakal | 'मुंबईच्या राजा'ची पूजा संपन्न, उत्सवात साधेपणा पण उत्साह मात्र तोच
sakal

बोलून बातमी शोधा

'मुंबईच्या राजा'ची पूजा संपन्न, उत्सवात साधेपणा पण उत्साह मात्र तोच

'मुंबईच्या राजा'ची पूजा संपन्न, उत्सवात साधेपणा पण उत्साह मात्र तोच

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यभरात आज सर्वत्र गणेशचतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्साह पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच घरोघरी गणरायाचं पूजन सुरु आहे. श्रीगणेशाला समर्पित असलेल्या गाण्यांचे मधुर सूर सकाळपासूनच कानावर येत आहेत. मुंबईत घरगुती गणपतींच्या बरोबरीने सार्वजनिक गणेशोत्सव (Mumbai ganesh festival) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पण यंदा कोविडमुळे काही मर्यादा आहेत. अनेक घरांमध्येच कालरात्रीच बाप्पांच्या मुर्ती विराजमान झाल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईची एक ओळख आहे. इथे मंडपांमध्ये विराजमान होणाऱ्या भव्य गणेशमुर्तीचे आणि सजावटीचे देशभरात आकर्षण आहे. पण यंदा कोरोनामुळे मुर्तीच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच मंडळांच्या मंडपांमध्ये चार फुटापर्यंत गणेश मुर्ती असणार आहे. कोरोनामुळे साधेपणाने उत्सव साजरे करण्याचे सलग दुसरे वर्ष आहे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येतोय. त्यामुळे लोकांनी सार्वजनिक उत्सव स्थळी गर्दी करु नये, असे आवाहन सरकारने केले आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात आलीय. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी मोठी गर्दी उसळते. यंदाही लालबागच्या राजाची मुर्ती मंडपात विराजमान झालीय.

हेही वाचा: मालिकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष; नव्या नात्यांचा श्रीगणेशा

पण लोकांना प्रत्यक्ष तिथे जाऊन दर्शन घेता येणार नाही. लालबागचा राजा, मुंबईचा राजा गणेशगल्लीसह बहुतांश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी या उपायोजना करण्यात आल्या आहेत. यंदा मुंबईच्या गणेशोत्सवात साधेपणा दिसत असला, तरी उत्साह मात्र तोच आहे.

loading image
go to top