esakal | मिरवणूक न काढता जागेवरच करणार ‘श्रीं’चे विसर्जन
sakal

बोलून बातमी शोधा

ganpati

सोशल डिस्टंसींगचे पालन करून यंदाचा गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी राबविण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे

मिरवणूक न काढता जागेवरच करणार ‘श्रीं’चे विसर्जन

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: गणेश उत्सवाची परंपरा व संस्कृती जोपासताना कोविडमुळे मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवात करण्यात येणार असल्याची माहिती श्रीगणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी शुक्रवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, सचिन खैरे, राजेंद्र दानवे, अभिजीत देशमुख, राजू शिंदे, मनोज पाटील, राजेंद्र दाते, अनिल मानकापे उपस्थित होते.

कोरोनाची स्थिती लक्षात घेता शासनाने गणेशोत्सव दरम्यान नियम व अटींचे निर्बंध घातले आहे. कोरोना बाधितांची रूग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. सोशल डिस्टंसींगचे पालन करून यंदाचा गणेश उत्सव सामाजिक उपक्रमांनी राबविण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. १० सप्टेंबरला ‘श्रीं’ची स्थापना, १३ व १४ सप्टेंबरला ऑनलाईन महालक्ष्मी देखावा स्पर्धा, १५ सप्टेंबरला वृक्षारोपण, १६ सप्टेंबरला कोविड लसीकरण शिबिर, १८ सप्टेंबरला कोविडमुळे मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांना शालेख साहित्याचे वाटप; तर १९ सप्टेंबरला ‘श्रीं’ चे विसर्जन करण्यात येणार आहे. ‘श्रीं’चे विसर्जनानिमित्त दरवर्षी भव्य मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यंदा सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार नाही. ‘श्रीं’ विसर्जन संस्थान गणपती येथेच जागेवर करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा: राखी बांधल्याने त्याच्यासोबत गेली... पण त्याच्या मनातच होते काळंबेरं

संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन-
श्रीगणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता.चार) सायंकाळी ४ वाजता श्री. बालाजी धर्मशाळा, शहागंज येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ़. भागवत कराड, रोहयोमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील यांची विशेष उपस्थिती; तर पृथ्वीराज पवार, माजी खा़ चंद्रकांत खैरे, आ़. हरिभाऊ बागडेंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

loading image
go to top