Ganeshotsav 2022: छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhatrapati shivaji maharaj jayanti

Ganeshotsav 2022: छत्रपती शिवरायांच्या काळातली परंपरा आजही जिवंत; दाभाडे गणपतीचा इतिहास जाणून घ्या!

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताच सण धामधुमीत झाला नव्हता. पण यंदा सगळ्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव जोरदार साजरा होणार असं दिसतंय. ढोलताशाचा गजर, आकर्षक रोषणाई, सजावटीचं साहित्य या सगळ्या रस्ते खुलून गेले आहेत. उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जाणून घेऊया दाभाडे गणपतीबद्दल.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: चिंतामणी आगमन सोहळ्याला मोबाईल चोरीचं गालबोट; भाविक त्रस्त

सरदार खंडेराव दाभाडे आणि पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे वंशज आजही तळेगाव दाभाडेमध्ये पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दाभाड्यांच्या घरी पूर्वीपासून सात दिवसांचा गणपती बसतो. हा गणपती पालखीतून येतो आणि पालखीतून जातो. एक घरातला आणि एक संस्थानचा असे दोन गणपती बसतात. दाभाडे घराण्याचे पाटील, राजपुरोहित, तिथला भुई समाज, वाजंत्री हे सगळेच वंशपरंपरेने सामील असतात. या सगळ्यांसोबत पालखी गावभर फिरते आणि मग घरी आणून तिची स्थापना केली जाते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

दाभाडे घराण्याचा इतिहास काय?

दाभाडे घराणं मूळचं गुजरातमधल्या बडोद्याजवळ असणाऱ्या दभोई या गावातलं. तिथं राहणारे म्हणून त्यांचं नाव दाभाडे पडलं. मुघलांच्या करामुळे दाभाडे गुजरातमधून निघून नाशकातल्या ओझर इथं स्थायिक झाले. या घराण्याचे बजाजी दाभाडे यांचा मुलगा येसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. छत्रपती शिवरायांना विशाळगडावर पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा मुलगा सरदार खंडेराव दाभाडे आणि त्यांची तिसरी पत्नी उमाबाई दाभाडे हे स्वराज्याच्या उभारणीमधल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत.

Web Title: Ganeshotsav 2022 Dabhade Ganesha Chhatrapati Shivaji Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..