
Ganeshotsav 2022 : लाडक्या बाप्पासाठी दिव्यांग मुलांचा सुर्यनमस्कार
कोणत्याही गोष्टीची सुरूवात गणेशाच्या पूजेशिवाय होत नाही. बुध्दीची देवता असलेले गणेश हे विद्यार्थ्यांचे आराध्य मानले जाते. त्यामुळे गणेशोत्सवात या बुध्दीदात्याकडे सुदृढ मनबुध्दी बरोबरच सुदृढ शरीराची प्रार्थना केली. बुध्दी, युक्तीचे दैवत असणाऱ्या गणरायाला शक्तीचे साकडे घालत विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर सामुहिक सूर्यनमस्कार घातले. दरवर्षी करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ९ वे वर्ष आहे.
सूर्यनमस्कार हे सर्व सक्षम ताकदीचे द्योतक आहे. यातून एक सज्ञान आणि सुसंस्कृत मनुष्य निर्मिती व्हावी यासाठी पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन १५ हजार सामूहिक सूर्यनमस्कार ने गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बाप्पाला वंदन केले
लक्ष्मी वेंकटेश एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,आणि इंस्टिट्यूट ऑफ योगा पुणे या तीन संस्थांच्या माध्यमातून सूर्यनमस्काराचा हा उपक्रम करण्यात आला. यात पुण्यातील ७ शाळांनी सहभाग घेतला होता त्यापैकी २ कर्णबधीर शाळा होत्या. ३६१ विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या १५ हजार सूर्यनमस्कार घातले.