esakal | आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये गणेशोत्सवाची धूम
sakal

बोलून बातमी शोधा

आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये गणेशोत्सवाची धूम

सुदान या देशातही गणेशोत्सव मराठमोळ्या पध्दतीने गेल्या पाच वर्षापासून साजरा केला जातो.

आफ्रिका खंडातील सुदान देशामध्ये गणेशोत्सवाची धूम

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा): महाराष्ट्र राज्यात भक्तिभावाने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची धूम सातासमुद्राच्या पार असलेल्या आफ्रिका खंडातील सुदान या देशापर्यंत पोहचली. सुदान या देशातही गणेशोत्सव मराठमोळ्या पध्दतीने गेल्या पाच वर्षापासून साजरा केला जातो.

हेही वाचा: केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; पसरणी घाट रस्ता आज बंद

सुदान मध्ये व्यवसाय व नोकरीनिमित्त राहत असलेले मराठीजन श्रद्धेने एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. सुदान मध्ये भारतातील विविध राज्यातील नागरिक नोकरी-व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे हिंदू -मुस्लिम व अन्य भारतीय एकत्र येऊन सुदान मध्ये गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षी गणेशाची मूर्ती भारतातून महेश गाडवे यांनी नेली आहे. गावापासून दूर असलेले मराठी जन या गणेशोत्सव कालावधीत एकत्र येतात. व साता समुद्रापार मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतात. गणपतीसाठी प्रसाद, दुर्वा सुदान मध्ये सहजपणे उपलब्ध होतात. नोकरी -व्यवसायामुळे घरापासून कोसो दूर असलेले मराठी जन सुदान मध्ये ही त्याच भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. असे सुदान मध्ये राहणारे केळघर गावचे महेश गाडवे यांनी इ सकाळशी बोलताना सांगितले.

हेही वाचा: केळघर घाटातील फेसाळणा-या धबधब्यांची लुटा मजा

आम्ही सुदान मध्ये ही महाराष्ट्र राज्याची मराठमोळी संस्कुती आवर्जून जपतो. मराठी सण-उत्सव एकत्र येऊन साजरे करतो त्यातून आम्हाला आपली संस्कृती दुसऱ्या देशात पोचवताना समाधान मिळते. असे सुदान मधील महाराष्ट्र राज्यातील युवराज मांडवकर, श्रीकांत बेलोशे, कैलास गोरडे, निखिल सैल या नागरिकांनी सांगितले .एकूणच आपल्या जन्मभूमीपासून लाखो किलोमीटर लांब असून आफ्रिका खंडात मराठमोळा गणेशोत्सव साजरा करण्याची कामगिरी या माध्यमातून होत असून मराठी संस्कृती चा प्रसार त्यामुळे संपूर्ण जगात होत आहे.

loading image
go to top