esakal | चिमुकल्यांच्या मोहक आवाजात गणरायाला साकडं! आरत्यांच्या चालीवरचं नवं गाणं
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुकल्यांच्या मोहक आवाजात गणरायाला साकडं!

चिमुकल्यांच्या मोहक आवाजात गणरायाला साकडं!

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : गणपती बाप्पाचं जंगी स्वागत करून आता २ वर्ष उलटली. अजूनही आपण कोरोनाच्या विळख्यात अडकलोच आहोत. आता कोरोनाचं हे विघ्न आता विघ्नहर्ता गणेशाचं दूर करेल या आशेने काही चिमुकल्यांनी आता गणरायाला साकडं घातलं आहे. संकटकाळात देवाकडे शुद्ध मनाने हाक मारली की देव ऐकतो असं म्हणतात. निरागस मुलामुलींची ही सुरेल हाक बाप्पा नक्की ऐकेल!

चिमुकल्यांच्या मोहक आवाजातील 'गणरायाला साकडं' हे गाण सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गीतकार आदित्य महाजन याने लिहले आहे तर संगीतकार धनश्री गणात्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. आर्य फडके, नील कानेटकर, शर्वरी देवधर आणि बेला कुलकर्णी या बालगायकांनी या गाण्याला स्वर दिले आहेत. गाण्यामध्ये वापरलेल्या सुंदर गणपती उत्सवातील व्हिडीओजचं छायाचित्रीकरण अनिकेत शिंदे यांनी केले आहे. "स्मृतिगंध" ह्या नामांकित फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रसिध्द झालं असून या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: प्रथम तुला वंदितो...!

हेही वाचा: त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

काही प्रचलित आरत्या आणि श्लोकांचे एक वेगळे आणि नवीन स्वरूप ही या गाण्याची विशेषता आहे. गाण्याची शब्दरचना आणि सांगीतिक रचना इतकी सुंदर आहे की हे गाणं सतत गुणगुणाव आणि पाठ कराव वाटेल. सर्वांना तोंडपाठ असलेल्या 'सुखकर्ता दुःखहर्ता', 'घालीन लोटांगण' आणि 'मोरया मोरया मी बाळ तान्हे' या आरत्या/ श्लोकांच्या चालीवर नवीन शब्दरचना या गाण्यात मांडली आहे. पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपतींचेही दर्शन गाण्याच्या व्हिडिओमध्ये होणार आहे.

loading image
go to top