esakal | गौरी-गणपतीमुळे फळे, भाज्यांची मागणी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

भाज्यांची आवकच

गौरी-गणपतीमुळे फळे, भाज्यांची मागणी वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गौरी गणपती सणामुळे घरोघरी भाज्यांना चांगली मागणी असते. येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (शनिवारी) सर्वच भाज्यांना मोठी मागणी होती. भाव स्थिर असल्याने भगिनींनी मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी केली. भाज्यांची ६९३ क्विंटल, तर बटाट्याची १९१ क्विंटल आवक झाली. कांद्याची ३१ हजार ४६० क्विंटल आवक झाली.

फळभाज्यांचे क्विंटलचे भाव

टोमॅटो ५५० ते ९००, वांगी एक हजार १५० ते एक हजार ८००, फ्लॉवर दीड ते दोन हजार, कोबी ४५० ते ५००, काकडी बाराशे ते तेराशे, गवार साडेसहा ते सात हजार, घोसाळी अडीच हजार, दोडका दीड ते दोन हजार, कारली दीड ते अडीच हजार दोनशे, भेंडी एक हजार ४०० ते एक हजार ८००, वाल अडीच ते साडेतीन हजार, घेवडा अडीच ते तीन हजार, बटाटा एक हजार ते एक हजार ३००, लसूण चार ते पाच हजार, हिरवी मिरची दीड ते दोन हजार, सिमला मिरची एक हजार ते एक हजार तीनशे, ते दोन हजार, आले दोन ते तीन हजार, शेवगा चार ते साडेपाच हजार, वाटाणा साडेसहा ते साडेसात हजार, बीट तीन ते चार हजार, डांगर ७५० ते एक हजार, दुधी भोपळा एक ते दीड हजार रुपये.

हेही वाचा: धक्कादायक! पैशाच्या वादातून तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या

पालेभाज्या (शेकडा)

मेथी एक ते एक हजार ३००, पालक ५०० ते ६००, शेपू ४५० ते ५००, कोथिंबीर एक ते एक हजार ३००जार ५०० रुपये.

फळांचे क्विंटलचे भाव

मोसंबी दोन हजार ५०० ते चार हजार, संत्री साडेतीन ते सहा हजार, डाळिंब सात ते तेरा हजार, पपई दीड ते अडीच हजार, सीताफळ साडेतीन ते सहा हजार, पेरू अडीच ते चार हजार, किवी १०५०, सफरचंद दहा ते चौदा हजार रुपये.

loading image
go to top