गणेशोत्सव मंडळाची संख्या घटली, नाशिकमध्ये आकडा सव्वा दोनशेवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival

गणेशोत्सव मंडळाची संख्या घटली, नाशिकमध्ये आकडा सव्वा दोनशेवर

नाशिक : गणेशोत्सव सुरू होऊन तीन दिवस झाले तरी, अवघ्या २१५ छोट्या मोठ्या गणेश मंडळांनी शहर पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. या व्यक्तीरिक्त ३५ सोसायटीमधील गणेश मंडळे असून, कोरोना नंतर दोन वर्षात सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ७० टक्क्यांपर्यंत घटल्याचे चित्र आहे.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी प्रशासनाने अनेक नियम घालून दिले आहेत. मंडपाची लांबी रुंदी, गणेश मूर्तीची उंची, मिरवणुकीस बंदी असे नियम घालताना प्रशासनाने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. २०१९ पर्यंतचा विचार करता शहरात सार्वजनिक गणेशोत्सव खूपच धूमधडाक्यात साजरा होत. छोटे आणि मोठे जवळपास साडेआठशे गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेत होते. घरगुती गणेश मूर्तींची संख्याही मोठी असते. दरवर्षी तीन लाखांपेक्षा अधिक घरांमध्ये गणपती बाप्पांचे स्वागत होते. यातील थोड्याफार प्रमाणात दीड दिवस, पाच दिवस वा सात दिवसांमध्ये विसर्जन होते. उर्वरित गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशीच होते. यंदा गणेश मंडळांमध्ये मात्र मोठी घसरण झाली आहे.


मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्येही ही संख्या घटली आहे. गणेश मंडळांच्या सोयीसाठी पोलिस आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. त्याद्वारे आलेल्या अर्जांना परवानगी देण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत २१५ छोटी मोठी मंडळे तर, ३५ सोसायटींमधील गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. अद्याप काम सुरूच असून, सोमवारीही मंडळांना परवानगी देण्याचे काम सुरू होते. दरम्यान, गणेश मंडळांची संख्या कमी झाली. त्यामुळे मौल्यवान गणेश मंडळेही कमी झाली आहेत. त्यात वर्षानुवर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंडळांचा समावेश नाही.

हेही वाचा: नाशिक-पुणे महामार्गावर जीवघेणे खड्डे; प्रवासी त्रस्त

कोरोनाच्या प्रादुर्भाव हे गणेशोत्सव मंडळ घटण्याचे प्रमुख कारण आहे. कोरोनामुळे दोन वर्षापासून निर्बंध आहेत. त्यात धार्मिक स्थळावर होणाऱ्या गर्दीमुळे गणेशोत्सव मंडळांना परिणाम भोगावा लागला आहे. कोरोनाचे निर्बंध वर्गणी जमा होण्यावरील मर्यादा, देखावे पाहायला गर्दी जमवायला प्रतिबंध असल्याने गणेशोत्सव प्रतिष्ठापना करण्यावर मर्यादा आल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: मालेगाव : एमआयएमने फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल

टॅग्स :Nashik